तर नाईलाजाने कुर्डूवाडीतुन बार्शीचे पाणी अडवावे लागेल – हर्षल बागल
आ.राऊत यांची संकटकाळात रुग्णांना अडवायची भाषा अयोग्य
कुर्डूवाडी / राहुल धोका -बार्शी शहरात 80 टक्के रुग्ण बाहेरचे आहेत .बार्शीला होणारा वैद्यकिय सुविधांचा पुरवठा कमी आहे. बाहेरील तालुक्यांनी आम्हाला सहकार्य करावे अन्यथा बाहेरच्या तालुक्यातील रुग्णांना बार्शीत अडवावे लागेल असे वादग्रस्त वक्तव्य बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केले. त्याचा समाचार घेत कुर्डूवाडीचे सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते हर्षल बागल यांनी राजेंद्र राऊत यांच्यावर संताप व्यक्त करित रुग्णांना आडवा आडवीची भाषा करणे ही भाषा एका आमदाराला शोभत नाही.आडवाआडवीचे काम हे गुंड करतात. ही वेळ राजकारण करायची नाही. एकमेकांना सहकार्य करायची आहे. लोकप्रतिनीधी म्हणुन सकंटकाळात कोणत्याच रुग्णांना आडवु नये, तशी तक्रार आली तर ताबडतोब बार्शीला ऊजनीतुन कुर्डूवाडीमार्गे जाणारा पाणीपुरवठा रोखला जाईल.तसे करणे आम्हालाही शोभत नाही पण जर तुम्ही तुमच्या अपयशाचे खापर शेजारच्या तालुक्यांवर व रुग्णांवर फोडत असाल तर आम्हाला नाईलाजाने पाणीपुरवठा लाईन बंद करावी लागेल. असा इशारा व्याख्याते हर्षल बागल यांनी दिला आहे.
औरंगजेबासारखं पाप आ.राऊत यांनी करु नये
बार्शीला रुग्णांना बरे करुन पुण्याई कमवयाची संधी आहे. बार्शीची वैद्यकीय यंत्रणा सक्षम आहे. शेजारच्या ऊस्मानाबाद जिल्ह्याने देखील सहकार्य केले पाहिजे. पण रुग्णांच्या मानसिकतेवर आघात होईल असे औरंगजेबाचं पाप आ.राऊत यांनी करु नये – हर्षल बागल
सोशलमिडियावर एका व्हिडीओ मधुन हर्षल बागल यांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. बार्शी तालुक्यातील वैद्यकीय यंत्रणा ऊभारणीत कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे मोलाचे योगदान आहे. कर्मवीरांच्या भुमीत सकंटकाळात कोरोना रुग्णांना आडवायची भाषा अशोभनीय आहे . आ. राजेंद्र राऊत यांनी रुग्णांना आडवण्यापेक्षा प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या गाड्या आडवुन दाखवा असे अवाहान देखील बागल यांनी आ. राऊत यांना केले आहे.
जुन्या संस्था टिकवा ,नव्या उभ्या करा
आ.राऊत यांनी शेजारच्या तालुका व जिल्ह्यांना जरुर भांडावे पण कागदार भांडावे. पण त्या आधी ज्या जुन्या सहकारी संस्था आहेत त्या टिकवा तसेच नविन संस्था उभा कराव्यात मग रुग्णांना आडवायची भाषा करावी. प्रत्येक तालुका हा शेजारच्या तालुक्याला काही ना काही देत असतो. परिपुर्ण स्वयंपुर्ण असा एकही तालुका नाही. वैद्यकीय यंत्रणा व शिक्षणव्यवस्था यात आ.राऊत यांचे योगदान काय ते सांगावे – हर्षल बागल
आजुबाजुच्या तालुक्यातील धान्य , भाजीपाला , भुसार माल बार्शीत घातला तर चालतो. शेजारच्या तालुक्यातील नागरिकांवरच बार्शीची पन्नास टक्के अर्थव्यवस्था आहे. आ. राऊत यांनी एकही सहकारी संस्था ऊभा केली नाही. एकही रुग्णालय अथवा एकही कोव्हिड सेंटर उभा केले नाही. एकही ऊद्योग तालुक्यात आणला नाही . शेजारच्या तालुक्यातील रस्ते बांधणीचे काम चालते पण रुग्ण चालत नाहीत . तालुक्यातील जनतेला व हाँस्पिटल लाँबीला खुष करण्यासाठी असली वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. मतांची बेरिज करण्यासाठी हा राजकिय स्टंट आहे . शेजारच्या तालुक्यावर स्वताचे अपयशाचे खापर फोडणे बंद करावे असे अनेक आरोप राजेंद्र राऊत यांच्यावर हर्षल बागल यांनी केलेत.
तर नाईलाजाने कुर्डूवाडीतुन बार्शीचे पाणी अडवावे लागेल – हर्षल बागल So Nilajane will have to block Barshi water from Kurduwadi – Hershal Bagal