General news

नाना शंकरशेट यांच्यावरील चरित्राचा प्रकाशन सोहळा संपन्न

नाना शंकरशेट यांच्यावरील चरित्राचा प्रकाशन सोहळा संपन्न

फलटण/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19/01/2024 : फलटण जि.सातारा येथील युवा लेखक व चरित्र अभ्यासक अमर शेंडे लिखित आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट या चरित्राचे प्रकाशन शुक्रवार, दि.19 रोजी दुपारी 3 वा.मुंबई विद्यापीठाच्या सर फिरोजशहा मेहता व्यवस्थापन परिषद दालन,फोर्ट,मुंबई येथे संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या महाराष्ट्राचे शिल्पकार या ग्रंथमालेंतर्गत प्रसिद्ध करण्यात आले आहे. या चरित्राच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन मुंबई विद्यापीठ व साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या महाराष्ट्राचे शिल्पकार या ग्रंथमाले अंतर्गत आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांच्या चरित्राचे प्रकाशन मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्यावतीने विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.रविंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते व महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ, ना.नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, मुंबई विद्यापीठाचे प्र.कुलगुरु प्राचार्य डॉ. अजय भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

180 वर्षांपूर्वी च्या तत्कालीन मुंबईच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, धार्मिक, व्यावसायिक जडणघडणीमध्ये अग्रेसर असणार्‍या नानांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती सांगणार्‍या व अभ्यासकांना उपयुक्त ठरणार्‍या या चरित्राच्या प्रकाशन समारंभास चरित्र अभ्यासक, साहित्यिक, लेखक व नाना प्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *