महिलांच्या रूममध्ये असे कॅमेरे बसविण्याची धक्कादायक बाब असून ही महिलांची फसवणूक गंभीर – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

भारती विद्यापीठ कॅम्पस मधील स्टाफ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या महिला डॉक्टरांच्या बेडरूम व बाथरूम मध्ये छुपे कॅमेरे लावल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. त्या फरार आरोपींचा शोध लवकरात लवकर घेण्यात यावा – उपसभापती विधान परिषद ,डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पुणे पोलीस आयुक्तांना निर्देश A shocking revelation has come to light that hidden cameras have been installed in the bedrooms and bathrooms of female doctors living in the staff quarters of the Bharati University campus. Search for the absconding accused should be done as soon as possible – Deputy Speaker, Legislative Council, Dr.Neelam Gorhe instructs Pune Police Commissioner

पुणे, दि.०९ जुलै २०२१ – एका विद्यापीठ कॅम्पस मधील स्टाफ क्वार्टर मध्ये राहणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या बेडरूम आणि बाथरूम मध्ये अज्ञात व्यक्तीने कॅमेरे लावल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. त्यानंतर पिडीत मुलीने दि 6 जुलै 2021रोजी नोंदविलेल्या तक्रारीनुसार पुणें पोलीसांनी आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करावी.महिलांच्या रूममध्ये असे कॅमेरे बसविण्याची धक्कादायक बाब दिसून आली. अश्या प्रकारे महिलांची होणारी फसवणूक ही गंभीर आहे असे मत उपसभापती विधान परिषद यांनी व्यक्त केले.अश्याच प्रकारचे किती गुन्हे आरोपीने केले आहेत याची माहिती मिळावी.

 याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना ना.डाँ.नीलम  गोऱ्हे उपसभापती महाराष्ट्र राज्य यांनी निवेदन सादर केले आहे. दि.6 जुलै 2021 रोजी ही घटना उघडकीस आली.भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे सदर घटनेची पोलीसांनी लवकरात लवकर चौकशी करावी म्हणजे असे अनेक गुन्हे समोर येऊन समाजातील सर्व महिलांना तसेच फिर्यादी महिला डॉक्टरांना न्याय मिळेल असेही मत डॉ नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला जामीन मिळू नये याची दक्षता घेण्यात यावी.अश्या अप प्रवृत्तीच्या व्यक्तींना कठोर शिक्षा झाल्यास समाजात अश्या गुन्ह्याची पुनरावृत्ती होणार नाही निश्चितच आळा बसेल असे ही डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. महिलांनी सुद्धा सजग राहून सावधानता बाळगावी असे आवाहन ही त्यांनी बोलताना केले.

एका काँलेजच्या कँपसमधील क्वार्टरमधील रुममध्ये आरोपी येतो कसा ? काही वेळ घालवत रुम मध्ये कॅमेरे बसवितो कसा ? कारण रूममधील महिला कधी येते ? कधी नसते ? हे माहितीच्या व्यक्ती शिवाय होणे अशक्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: