सायबर तसेच सोशल मिडियाच्या सहाय्याने अनेक मुलींची होतेय फसवणूक- ना.डॉ. नीलम गोऱ्हे

सायबर तसेच सोशल मिडियाच्या सहाय्याने मुलींची फसवणूक होतेय अशा घटनांतील आरोपींवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करा – ना.डॉ.नीलम गोऱ्हे… Many girls are cheated with the help of cyber and social media – Neelam Gorhe
पुण्यातील आरोपीने ५७ मुलींना फसवल्याच्या घटनेची दखल
   पुणे,दि.०९ जुलै,२०२१ - राज्यात सोशल मीडियावर कार्यरत मुलींवर पळत ठेवून त्यांना फसविण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.  काही दिवसांपूर्वी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये एक घटना समोर आली आहे. यात आरोपीने तब्बल ५७ तरुणींना लग्नाचे अमिष दाखवून फसविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

   यात सदरील आरोपीने मुलींची आर्थिक फसवणूक,मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे निदर्शनास आले आहे. 

  सदरील घटनेबाबत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून खालील सूचना केल्या आहेत...

★ एक किंवा अनेक मुलींना सोशल मीडिया किंवा सायबरच्या मार्फत मानसिक,शारीरिक पिळवणूक आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपींवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात यावी.
★ सदरील आरोपीने आणखी काही तरुणींना फसविले आहे का हे तपासण्यासाठी तपासी अधिकारी म्हणून एक महिला पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करून त्यांचा दूरध्वनी क्रमांक देण्यात यावा.
★ वारंवार महिलांना फसवणारे करणारे सराईत गुन्हेगार यांची यादी गुन्हे अन्वेषण विभागाने सर्व पोलीस ठाण्यात देऊन यांच्यावर देखरेख करणारी यंत्रणा उभारण्याबाबत सूचना देण्यात यावी.
★ सध्या सोशल मीडियाचा वापर हा मुलींना फसविण्यासाठी होत असल्याने सर्व स्तरावरील मुलींना व महिलांना जागृत करण्यासाठी पोलीस स्टेशन व महिला व बालविकास विभागामार्फत भरोसा सेल व महिला दक्षता समितीद्वारे शाळां मधून जागृतीचे कार्यक्रम हाती घ्यावेत.
★ अशा प्रकारच्या ज्या केसेस राज्यात विविध ठिकाणी घडत आहेत, त्याचा अभ्यास करून त्यातील गेल्या २ वर्षातील या प्रकारे अनेक महिलांना फसवलेल्या केसेसची माहिती त्यातील नावांचा तपशील गोपनीय ठेऊन सर्वाना उपलब्ध करून द्यावा. या केसस्टडीचा उपयोग महिला दक्षता समित्यांमार्फत शालेय शिक्षण,उच्च शिक्षण, महिला बालविकास ,सामाजिक न्याय आदि विभागांच्या मदतीने जागृतीसाठी करण्यात यावी. वरील सुचनांवर कार्यवाही होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश निर्गमित करण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालकांना केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: