केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट

चैत्यभूमी ला भेट देण्यासह विविध मागण्यांचे दिले निवेदन

 मुंबई दि.13 – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी भेट द्यावी यासह विविध मागण्यांचे  निवेदन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेऊन दिले.यावेळी त्यांच्या समवेत दुबई येथील उद्योजक बु अब्दुल्ला ग्रूप चे चेयरमन डॉ बु अब्दुल्ला आणि इंटरनॅशनल फॉरम फॉर अँटी करप्शन चे उपाध्यक्ष आणि उद्योजक डॉ.तौसिफ पाशा उपस्थित होते.

  आदिवासी इतर मागासवर्गीय कर्मचारी अधिकाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करणारा कायदा संसदेत संमत व्हावा, खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे या मागण्यांचेही निवेदन ना.रामदास आठवले यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना दिले. 

मागील मुंबई दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या चैत्यभूमीला भेट देऊ शकल्या नाहीत.त्यामुळे येत्या नोव्हेंबर मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पुढाकारातून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून त्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी येथे भेट देण्याची विनंती ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: