तुमच्यामुळे तीनदा आमदार,कामे केल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेने विश्वास ठेवून खासदार म्हणून निवडून दिले तुमची कामं करणे हेच माझे ध्येय:- प्रणिती शिंदे
तीन महिन्यात विधानसभा निवडणूक भाजप पुन्हा जातीधर्मात भांडणे लावण्याचा प्रयत्न करणार,महाविकास आघाडीच्यावतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा जिंकण्याचा निर्धार
सोलापूर लोकसभा मतदार संघातील जनतेने साथ देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आभार व्यक्त

सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७ जुलै २०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर मागे असलेल्या कै.राजमल बोमड्याल मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने आणि सहकार्य केलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष,शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष,महविकास आघाडीचे इतर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी कृतज्ञता व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भारताच्या प्रत्येक नागरिकांसाठी जिथे कायदे बनविले जातात त्या लोकशाहीचे मंदिर असलेल्या सर्वोच्च सभागृहात केवळ तुमच्या आशीर्वादामुळे पोहोचले आहे. तो क्षण मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. हा विजय माझ्या एकटीचा नाही काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या सहकार्याने झाला आहे. ही निवडणूक सोप्पी नव्हती. पूर्वीचे निवडणूक विचारसरणी, तत्वावर लढायचे पण या निवडणुकीत चारसो पार, पैश्याचा वापर, ईडी, सीबीआय, जातीधर्मात भांडणे लावण्याचा प्रयत्न केला.काही जणांनी मॅनेज होऊन वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न यासारख्या अनेक गोष्टींचा वापर केला गेला पण जनतेने लोकशाहीत लोकांची ताकद सर्वांपेक्षा जास्त असते हे दाखवून दिले. जनता जनार्दन आमच्यासाठी देव आहेत म्हणून निवडून दिलेल्या देवासमोर आज कृतज्ञता व्यक्त करते.
आता तुमच्या सर्वांची कामे करणे हेच माझे कर्तव्य आहे. तुमचे स्वप्न हे माझे स्वप्न आहेत. कामे केल्यामुळे शहरातील जनतेने मला तीनदा आमदार म्हणून निवडून दिले काम करणारे आहेत म्हणून ग्रामीण भागातील जनतेने आत्ता विश्वास दाखवून खासदार म्हणून निवडून दिले. येणाऱ्या तीन महिन्यांनी विधानसभा निवडणूक आहे. भाजप पुन्हा जातीधर्मात भांडणे लावण्याचा उद्योग करणार आहे.त्या गोष्टीला बळी पडू नका शेवटी नुकसान आपले होणार आहे. म्हणून काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन जागृती करा.सोलापूर लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार निवडून आणण्यासाठी तयारीला लागू या असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

या कार्यक्रमास ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, धर्मराज काडादी, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री,भाकप चे कॉ. नरसय्या आडम मास्तर, माजी महापौर महेश कोठे, जनार्दन कारमपुरी, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार,संजय हेमगड्डी,प्रवक्ते अशोक नींबर्गी, अलकाताई राठोड, सुशिला आबुटे, मनोहर सपाटे, आरिफ शेख, शिवसेनेचे अस्मिता गायकवाड, अजय दासरी, विष्णू कारमपुरी,प्रताप चव्हाण,महेश धाराशिवकर, आम आदमी पार्टीचे निहाल किरनल्ली, समाजवादी पार्टीचे अबुतालीब डोंगरे,महेश गादेकर, सुरेश फलमारी,दत्ता सुरवसे,नाना काळे, भारत जाधव, महादेव कोगणूरे, सुनीता रोटे, सुदीप चाकोते, रियाज हुंडेकरी, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, तौफिक हत्तूरे, शिबा बाटलीवाला, फिरदोस पटेल, वैष्णवी करगुळे, कुमुद अंकराम, नलिनीताई कलबुर्गी, नसीमा शेख, प्रमिला तूपलवंडे, गणेश डोंगरे, अंबादास करगुळे,वाहिद बिजापूरे, दत्तु बंदपट्टे, केदार उंबरजे,देवाभाऊ गायकवाड,बाबुराव म्हेत्रे,उदयशंकर चाकोते, लक्ष्मीकांत साका, सुनील रसाळे,सुशील बंदपट्टे,उमेश मामड्याल, शौकत पठाण, किसन मेकाले, एजाज बागवान, भीमाशंकर टेकाळे, उमेश सुरते, नागनाथ कदम, युवराज जाधव यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.