मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागला रिपब्लिकन पक्ष

वॉर्ड क्र.93 च्या रिपाइं च्या जनसंपर्क कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन Republican Party begins preparations for Mumbai Municipal Corporation elections
 मुंबई दि.09/07/2021 - पुढील वर्षी फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला रिपब्लिकन पक्षाने जोरदार सुरुवात केली असून बांद्रा पूर्व येथील मुंबई मनपा च्या वॉर्ड क्र 93 च्या रिपब्लिकन पक्षाच्या जन संपर्क कार्यालयाचे उदघाटन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. रिपब्लिकन पक्षाच्या रोजगार आघाडी चे मुंबई अध्यक्ष अमित तांबे यांच्या पुढाकारातून वॉर्ड क्र 93 मध्ये रिपाइं च्या जन संपर्क कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे. या कार्यालयातून स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळवून द्यावा; रोजगार आणि करियर मार्गदर्शन करावे तसेच स्थानिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे जनसंपर्क कार्यालय सर्वांसाठी खुले राहावे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले. 

  रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांच्या पुढाकारातून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी सांताक्रूझ भीमछाया सांस्कृतिक केंद्र येथे यापूर्वी  बैठक घेण्यात आली होती.या बैठकीत पक्षाध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून मुंबई महापालिका निवडणुकीत किमान 55  वॉर्ड जिंकण्याची तयारी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार विभागा विभागात रिपाइं कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. बांद्रा वॉर्ड क्र 93 येथे रिपाइं चे कार्यकर्ते अमित तांबे यांनी जनसंपर्क कार्यालय उभारून आपल्या इच्छूक उमेदवारीची गुढी उभारली आहे. 

यावेळी रिपाइं रोजगार जिल्हाध्यक्ष विवेक पवार, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे मुस्तक बाबा रोजगार आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष चंदू जगताप, सचिन कासारे,घनश्याम चिरणकर,संजय खंडागळे, संतोष बिरवाडकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: