business

सर्व सामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प हाती घ्यावेत:- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

क्रेडाई गृहउत्सवास नागरिकांचा प्रतिसाद

सर्व सामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प हाती घ्यावेत:- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : क्रेडाई पंढरपूरने आयोजित केलेल्या गृह उत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी दि.१९ रोजी उंच व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री आमदार चंद्रकांतदादा पाटील,आमदार समाधान आवताडे, मा.आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन शुगर लि चे चेअरमन उमेश परिचारक, क्रेडाई नॅशनलचे सुनील फुरडे,गव्हर्निंग कौन्सलिंग मेंबर शांतीलाल कटारिया,प्रणव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले कि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोलापूरला रे नगर या गृह प्रकल्पातील सदनिकांचे वितरण झाले. रे नगर प्रमाणे क्रेडाई संघटनेने सामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प हाती घ्यावेत,राज्य शासन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल. क्रेडाई पंढरपूरने गृह उत्सवाचे आयोजन उत्कृष्टपणे केले आहे व या प्रदर्शनामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी गृहप्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध होत आहे.भविष्यात पंढरपूरच्या विकास योजना राबविताना क्रेडाई पंढरपूरला सामावून घेतले जाईल असे प्रतिपादन उंच व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

या गृह उत्सव प्रदर्शनामध्ये बांधकाम व्यवसायिकांचे गृह प्रकल्प,फ्लॅट्स,रो हाऊस, ओपन प्लॉट्स यांचे प्रदर्शन केले जाणार आहे.बांधकामास आवश्यक असणारे सळई, सिमेंट,रंग,सॅनिटरी वेअर आदी साहित्य व गृहकर्ज पुरवठा करणाऱ्या वित्त संस्था या सर्वांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून क्रेडाई पंढरपूरने प्रथमच या गृहउत्सवाचे आयोजन केले आहे.

प्रदर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी क्रेडाई पंढरपूर तर्फे आकर्षक बक्षिसे व स्कीम मध्ये बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक सूट देण्यात आली आहे. दि १९,२०,२१ जानेवारी रोजी पंढरपूर शहरामध्ये रेल्वे ग्राउंड येथे सदर गृहउत्सवाचे आयोजन केले असून पंढरपुरातील नागरिकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन क्रेडाई पंढरपूरच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *