सामाजिक न्यूज

इंडियन डेंटल असोसिएशन तर्फे प्रजासत्ताक दिनी रक्तदान शिबिर

इंडियन डेंटल असोसिएशन तर्फे प्रजासत्ताक दिनी रक्तदान शिबिर

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते, कारण जर एखाद्या गंभीर रुग्णाचा जीव वाचवायला रक्त हे गरजेचे असते.तुमचे एक रक्तदान हे तीन जणांचे जीव वाचवु शकते,त्यामुळे रक्तदान करुन आपण कोणाचा तरी जीव वाचवत असतो.त्यासाठी इंडियन डेंटल असोसिएशन च्या पंढरपुर शाखेतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

दि.२६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत रोटरी भवन ,उमा कॉलेज जवळ उपस्थित राहून रक्तदान करुन राष्ट्रसेवेच्या कार्यास हातभार लावावा आणि समाजाच्या आणि देशहिताच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन इंडियन डेंटल असोसिएशन शाखा पंढरपुर च्या अध्यक्षा डॉ ऋचा खुपसंगिकर, सचिव डॉ प्रतिभा देशपांडे यांच्यासह सर्व पदाधिकार्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *