आटपाडीत माणदेशाचे नवे विद्यापीठच साकारा – सादिक खाटीक यांचे जयंत पाटील यांना साकडे
आटपाडीत माणदेशाचे नवे विद्यापीठच साकारा – सादिक खाटीक यांचे जयंत पाटील यांना साकडे
The new university of Mandesha in Atpadi – Sakara to Sadiq Khatik’s Jayant Patil
आटपाडी ,दि.१० /प्रतिनिधी - आटपाडीत माणदेशाचे नवे विद्यापीठच स्थापन करा, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आटपाडीचे सादिक खाटीक यांनी सांगली जिल्ह्या चे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे धरला आहे.
शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर,बस्तवडे, सांगली, तासगांव, आटपाडी यापैकी एका ठिकाणी व्हावे यासाठी सुरु असलेले प्रयत्न, पत्रव्यवहार, आंदोलने, वक्तव्ये या पार्श्वभूमीवर सादिक खाटीक यांनी ईमेलवरून आटपाडीत नवे विद्यापीठच व्हावे या मागणीकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले आहे .
डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूपद भुषविणारे शंकरराव खरात हे आटपाडीचेच असून त्यांच्यासह थोर साहित्यिक ग.दि.माडगुळकर,व्यंकटेश माडगुळकर, ना.सं. इनामदार आणि बाळासाहेब पंत प्रतिनिधी या आटपाडीशी संबंध असणाऱ्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.एकाच तालुक्यातले पाच अध्यक्ष देणारा आटपाडी हा तालुका राज्यात एकमेव असू शकतो.
राज्य,राष्ट्रीय स्तरावर गाजलेले विविध क्षेत्रातील आटपाडी तालुक्याशी संबध असलेल्यांनी माणदेशी आटपाडीचे नाव अजरामर केले आहे . माणदेशाचाच भाग असलेल्या जत, कवठेमहंकाळ ,सांगोला,मंगळवेढा,माण,खटाव, खानापूर या तालुक्यातील साहित्यीक, प्रज्ञावंत, गुणवंत यांची ही संख्या मोठी आहे. आटपाडी तालुक्यात वेगवेगळ्या शिक्षण संस्थाच्या माध्यमातून किमान ५० हायस्कुल - विद्यालय, अनेक महाविद्यालये कार्यरत आहेत . येथील शिक्षण संस्थाचे कार्यक्षेत्र सोलापूर,सातारा जिल्हयातही आहे.सांगली, सातारा,सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील या माणदेशी ८ तालुक्यातील सुमारे ४०० हायस्कुल , १०० महाविद्यालये व शिक्षणाची अन्य दालने या नव्या विद्यापीठाचा भाग बनतील .
निर्मितीच्या पंचाहत्तरीत संपूर्ण सांगली जिल्हा सर्वच क्षेत्रात देशात अव्वल असला पाहीजे हे मंत्री जयंत पाटील यांचे व्हीजन आहे आणि या व्हीजन मध्ये माणदेशातले आटपाडी,खानापूर, जत, कवठे महंकाळ तालुक्यांचा समावेश आहे. अशा स्वप्नांना साकरण्यासाठी आपल्या सारखा दुरदृष्टीचा, मोठे व्हीजन असणारा नेताच न्याय देवू शकतो . सातारा - सांगली जिल्ह्याच्या एकत्रित लोकल बोर्डाच्या उपाध्यक्षपदी आटपाडीच्या नेतृत्वाला ६७ वर्षापूर्वी संधी देणारे जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष, आपले परमपुज्य पिताश्री राजारामबापू पाटील यांनी आटपाडी तालुक्याला प्रथम प्राधान्याने झुकते माप दिल्याचा इतिहास आहे आणि आपल्या ही अंतःकरणात आटपाडी तालुक्याला अनन्य साधारण स्थान आहे. माण देशाच्या मुख्यालय आटपाडीत नवे विद्यापीठ साकारणे हे आपल्या व्हीजनचाच एक भाग ठरूद्यात असेही सादिक खाटीक यांनी या इमेल मध्ये मत व्यक्त केले आहे .