राजकीय न्यूज

हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे संशोधन केंद्राच्या मसुदा समिती सदस्यपदी संभाजी शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे संशोधन केंद्र सुरू होणार

भाळवणी / ज्ञानप्रवाह न्यूज – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार असून या संशोधन केंद्राच्या मसुदा समितीच्या सदस्यपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्वाने गेल्या ४० वर्षापासून एका निष्ठेने राहून तळागाळामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार रुजवत अनेक चळवळींमध्ये सहभाग नोंदवून वाड्या वस्तीवर व गल्लोगल्ली समाजसेवेच्या रूपातून प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे संभाजी शिंदे यांची निवड झाली आहे.

त्यामुळे संभाजी शिंदे यांच्या निष्ठेला न्याय मिळाला आहे अशी चर्चा होत आहे. संभाजी शिंदे यांनी शिवसेनेच्या तसेच भाळवणी ग्रामपंचायत,पंचायत समिती पंढरपूर ,विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अशा अनेक माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा ग्रामीण भागाबरोबर शहरांमध्ये उमटवला आहे. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे संशोधन केंद्रामध्ये झालेल्या निवडीने ते आपल्या या पदाला न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *