धार्मिक न्यूज

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते श्री साईबाबा मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांचे पूजन आणि महाआरती

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते सोमवारी आळंदी येथील श्री साईबाबा मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांचे पूजन आणि महाआरती

पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१ : येत्या २२ जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.आयोध्येसह देशभरात सोहळ्याचा उत्सव होत आहे. त्यानिमित्ताने आळंदी येथील श्री साईबाबा मंदिरात सोमवार दि २२ जानेवारी रोजी दुपारी ११ वाजता विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते भगवान श्री रामांच्या मूर्तीचे पूजन महाआरती व होमहवन होणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री साई सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट,वडमुखवाडी विश्वस्त शिवकुमार नेलगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *