नागरिकांनी आरोग्यदायी जीवन शैलीचा अवलंब करावा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

नागरिकांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण Citizens should adopt a healthy lifestyle – Collector Sunil Chavan
• बजाज ग्रुप तर्फे मोफत कोविड-19 लसीकरणाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन

औरंगाबाद,दि 10 (जिमाका)- कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे कोरोना संसर्ग कमी होण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर या कोरोना काळात सुदृढ आरोग्याचे महत्त्वही सर्वांना पटले आहे. तेव्हा लस घेतल्यावरही सर्वांनी मास्कचा वापर, योग्य अंतर राखणे, सतत हात धुणे या त्रिसुत्रीचा वापर करत आरोग्यदायी जीवनशैलीचा अवश्य अवलंब करावा,सामाजिक दायीत्व स्वीकारुन येथील नागरिकांसाठी मोफत कोविड-19 लसीकरण सुरु केलेल्या बजाज ग्रुप प्रमाणेच इतर कंपन्यांनीही अशाप्रकारे सामाजिक दायीत्व स्वीकारत मोफत कोविड-19 लसीकरण उपक्रम राबवित प्रशासनास सहकार्य केल्यास जिल्हा लवकर कोरोना मुक्त होईल असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केले.

बजाज हॉस्पीटल,जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था व बजाज ऑटो ग्रुपच्यावतीने वाळूज येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल-रुक्मीणी मंदीर परिसरात मोफत कोविड-19 लसीकरणाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. यावेळी बजाज ग्रुपचे मुख्य सल्लागार सी. पी. त्रिपाठी, श्रीमती त्रिपाठी, बजाजच्या मराठवाडा विकास क्षेत्राचे रणधीर पाटील, सरपंच वैशालीताई राऊत, जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य, नायब तहसीलदार निखिल धुळधर, तालुका आरोग्य अधिकारी संग्राम बामणे, विठ्ठल – रुक्मीणी मंदीर समितीचे सदस्य तसेच लसीकरणासाठी आलेले ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री.त्रिपाठी यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या कोरोना संसर्ग रोखण्याच्या कार्याचे यावेळी कौतुक केले. यापूर्वी बजाज कंपनीने आपल्या संपूर्ण कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे शंभर टक्के मोफत लसीकरण केले आहे.तेव्हा श्रीमती त्रिपाठी यांनी गावकऱ्यांसाठीही मोफत लसीकरणाची संकल्पना मांडली तेव्हा जिल्ह्यात बजाज ग्रुपने सामाजिक दायीत्व स्वीकारत पंढरपूर गावातील पात्र लाभार्थ्यांसाठी सहाहजार मोफत कोविड-19 लसीकरणाचे आयोजन केले आहे. त्याचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. त्रिपाठी यांनी केले. 

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: