गावरान टोला , गावठी चिमटा
गावरान टोला :
मंत्री होताच चौकातील
पोळ दारात येतात
सत्ता असेपर्यंतच ते थांबतात
सतत भाटगिरी करतात,सत्ता जाताच ते
न सांगताच गायब होतात
मात्र आज अशांचे दिवस चांगले आहेत
नको ते लोक खुर्चीवर दिसतात
म्हणूनच असे दिवस
सामान्यांच्या वाट्यास येतात “!!
गावठी चिमटा……
जिथे सत्ता ,तिथे दास
जिथे अधिकार ,तिथे भ्रष्टाचार
जिथे निवडणूक ,तिथे फसवणूक
जिथे खुळा ,तिथे मुळा
जिथे देवाण घेवाण ,तिथे लळा
जिथे अनीती ,तिथे अवकळा”!!
"सुप्रभात"
कर्तृत्व दाखवलं तरच जगण्याला अर्थ व सार्थकता प्राप्त होते !!
आनंद कोठडीया,जेऊर ता. करमाळा
९४०४६९२२००
