तुका म्हणे -भक्ती प्रवाह

       तुका म्हणे  

लाभ तया झाला संसारा येऊनी ।
भगवंत ऋणी भक्ती केला ।।३६।।

लागलेसे पिसे काय मूढ जना ।
काय नारायणा विसरली ।।३७।।

विसरली तया थोर झाली हाणी ।
पचतील खाणी चौऱ्यांसीच्या ।।३८।।

शिकविता नाही तरी कोणा लाज ।
लागलीसे भाज धन गोड ।।३९।।

गोड एक आहे अविट गोविंद ।
आणिक ते छंद नाशिवंत ।।४०।।

अर्थ –

ज्याने भक्तीच्या भावाने देवाला ऋणी केले त्यालाच खरा संसारात येऊन लाभ झाला म्हणायचा. ।।३६।।

परंतु ह्या मुर्ख लोकांना काय संसाराची भुरळ पडली आहे जे ते नारायणाला विसरले आहेत ? ।।३७।।

जे देवाला विसरले त्यांची मात्र मोठी हानी झाली. ते चौऱ्यांशी लक्ष योनींमध्ये फिरत राहतील ।।३८।।

लोकांना कितीही परमार्थ सांगितला तरी ते निर्लज्जासारखे संसाराचीच आवड धरतात. त्यांना पत्नी आणि धनच गोड वाटते. ।।३९।।

मात्र खरा गोड एक गोविंदच आहे. त्याशिवाय असलेले सगळे छंद नाशवान आहेत. ।।४०।।

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: