श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पायी दिंडी सोहळ्याची मंदिर समितीकडे नोंद घ्यावी – काकासाहेब बुराडे
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पायी दिंडी सोहळ्याची मंदिर समितीकडे नोंद घ्यावी – काकासाहेब बुराडे Shri Sant Shiromani Narhari Maharaj Payee Dindi ceremony should be registered with the temple committee – Kakasaheb Burade
पंढरपूर / नागेश आदापुरे - पंढरपूर सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पायी दिंडी पालखी सोहळा दरवर्षी नेवासा वरून गेली सत्तावीस वर्ष हजारो नरहरीचे भाविक भक्त पंढरपूरला पायी येत असतात. हा दिंडी पायी सोहळा वर्षानुवर्षे व्यापक स्वरूप धारण करीत असल्याने समाजातील लोकांनी वीस वर्षांपूर्वी सन 2002 साली माननीय धर्मादाय आयुक्त कार्यालयातून ऐ११२०२ या क्रमांकाने हा पायी दिंडी सोहळा नोंदणीकृत करून घेतला.परंतु इतर पायी दिंडी सोहळा प्रमाणे या ही पालखी सोहळ्याची नोंद मंदिर समितीकडे होणे गरजेचे आहे. संत नरहरी महाराज सोनार आणि विठ्ठलाचे एक वेगळे नाते होते हे पूर्ण जगाला माहित आहे. साक्षात पांडुरंग आत विलीन झालेले ते एकमेव संत होऊन गेले.
अशा थोर संतांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्याची श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने नोंद करून घेण्याची मागणी तमाम महाराष्ट्रातील सोनार बांधव व नरहरी भक्तांच्या मागणीचे निवेदन समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्याकडे काकासाहेब बुराडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी लंकेश बुराडे ,प्रशांत बागडे, रामचंद्र आष्टेकर,अक्षय सोनार, गुरु अष्टेकर आदी उपस्थित होते.