तारापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा
तारापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा Agriculture Day celebrated at Tarapur

पंढरपूर / प्रतिनिधी- हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तारापूर , ता.पंढरपूर येथे ग्रामपंचायत कार्यालयात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कृषीदूत विवेक मच्छिंद्र सपाटे व रोहीणी जालिंदर शेळके यांनी कृषी दिनाचे औचित्य साधून कृषी कार्यानुभव कार्यक्रम आयोजित वृक्षारोपण करून शेतकर्यांना विविध पिकांविषयी व जमिनीच्या मशागती आणि विविध खतांच्या वापरा विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी सरपंच विश्वनाथ कोळी, उपसरपंच समाधान जगताप यांच्यासह शेतकरी सचिन सपाटे,रामचंद्र सपाटे,विक्रम शेळके,गोरख वाघमोडे,तुकाराम वाघमोडे, संतोष शेळके, अतिष गायकवाड आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचारी औदुंबर सपाटे यांनी आभार मानले.