लायन्स क्लब जुळे सोलापूर तर्फे जागतिक लोकसंख्या दिन साजरा

लायन्स क्लब जुळे सोलापूर तर्फे जागतिक लोकसंख्या दिन साजरा Lions Club Twins Celebrate World Population Day by Solapur
   सोलापूर, 11/07/2021 - लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटीतर्फे रविवार दि.११/७/२०२१ रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष सौ. नंदिनी जाधव यांनी वाढत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त करून लोकसंख्या वाढीमुळे होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले. लोकसंख्या वाढल्याने लोक रोजगाराच्या शोधात वेगवेगळ्या शहरांकडे वळू लागले. नोकरीच्या संधी कमी झाल्याने बेरोजगारी वाढू लागली. परिणामी गरिबीमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली,आरोग्याच्या सोयी देखील अपुऱ्या पडू लागल्या असे म्हणाल्या. 

सचिव अभियंता सागर पुकाळे यांनी”छोटे कुटुंब , सुखी कुटुंब” हेच भविष्यातील आनंदी राहण्याचे सूत्र असल्याचे म्हणत आपले भविष्य वाचवण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात राहणे अतिशय गरजेचं आहे. लोकसंख्या World Population नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे, याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आम्ही हा दिवस साजरा करत असल्याचे सांगितले.

    या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सोमशेखर भोगडे यांनी केले.यावेळी खजिनदार सुनंदा शेंडगे, राजीव देसाई,नागेश बुगडे,ममता बुगडे, मुकुंद जाधव,वरदा देसाई,गुरुशांत माळगे , औदाप्पा पुजारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: