सौ.सुशीला अरूण माने यांच्याकडून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास लाखाची देणगी

सौ.सुशीला अरूण माने यांच्याकडून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास लाखाची देणगी Donation of Rs.1 lakh to shree Vitthal Rukmini Mandir by Mrs.Arun Mane
  पंढरपूर - आज रविवार दि .११/०७/२०२१ आषाढ शु.१ आषाढ मासारंभ निमीत्त सौ.सुशीला अरूण माने रा.साईनगर अकलूज रोड,माळशिरस यांनी घर संसाराकरीता दिलेल्या खर्चाच्या रक्कमे तून बचत करून कोरोना महामारीच्या संकटामुळे मंदिर दीड वर्षाहून अधिक काळ दर्शनास बंद असलेमुळे देणगीचे प्रमाण घटले आहे , त्यात आपला खारीचा वाटा म्हणून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास रू १,१०,१११/ - अक्षरी एक लाख दहा हजार एकशे अकरा रूपयांची देणगी अन्नछत्रा करिता देण्याबाबत मंदिरे समितीस कळविले , तथापी वर्धाक्यामुळे त्यांना येथे येणे शक्य नसल्याने समिती मार्फत देणगी घरी येऊन स्विकारावी अशी विनंती त्यांनी केली होती . त्यास प्रतिसाद देत मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांचे सुचनेनुसार मंदिरे समितीचे लिपीक शहाजी मोहन देवकर व सुधाकर भिमराव घोडके यांनी त्यांचे घरी जाऊन आज रोजी अन्नदानासाठी रक्कम स्विकारून त्यांना त्याची देणगी पावती दिली . 

  त्यावेळी मंदिरे समिती तर्फे श्री व सौ.सुशीला अरूण माने यांचा सत्कार श्रीं ची प्रतिमा ,उपरणे , रूक्मिणी मातेचे महावस्त्र व दैनंदिनी देऊन करण्यात आला . त्यावेळी त्यांचा मुलगा दत्तात्रय अरूण माने व सौ.साधना दत्तात्रय माने व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: