शेळवे येथे उजनी कालवाग्रस्त शेतकऱ्यांची पहिली सहविचार सभा उत्स्फूर्तपणे संपन्न

शेळवे येथे उजनी कालवाग्रस्त शेतकऱ्यांची पहिली सहविचार सभा उत्स्फूर्तपणे संपन्न The first symposium meeting of Ujani canal affected farmers was held spontaneously at Shelve

शेळवे /संभाजी वाघुले – उजनी कालवा वितरीका क्र २४ ‘अ’ या कालव्यासाठी उपरी, भंडीशेगाव, शेळवे, खेडभाळवणी, कौठळी,वाडीकुरोली, गादेगाव,शिरढोन, वाखरी इत्यादी गावातील हजारो शेतकऱ्यांच्या काळ्या कसदार जमिनीतून उजनीचा कालवा गेला असून मागील 30 वर्षांपासून त्याचा भूसंपादन मोबदल्याचा प्रश्न प्रलंबित आहे, शासनाने जाहीर केलेला मोबदला अतिशय तुटपुंजा असून तो शेतकऱ्यांना मान्य नाही, म्हणून शेतकऱ्यांनी पाठबंधारे विभागाला तशा प्रकारे लेखी कळीवले होते, शिवाय समृद्धी महामार्गप्रमाणे भरीव मोबदला मिळावा अशी वेळोवेळी मागणीही केली होती, परंतु तरीही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे शासन-प्रशासन व पाटबंधारे विभाग यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं, कोरोना महामारीच्या काळात उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना उजनी कालव्याच्या भरीव मोबदल्याची अपेक्षा होती पण संबंधित अधिकाऱ्यांच्या चुकीच्या सर्व्हे मुळे, शासन-प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे हजारो शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे, पाच पटीच्या नावाखाली अनेक नियम,अटी आणि निकष लावून शासनाने शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली म्हणून कालवाग्रस्त शेतकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो कालवा ग्रस्त शेतकरी एकत्र आले.मागील आठ दिवसां पासून या सर्व शेतकऱ्यांनी उजनी पाटबंधारे विभाग यांची चुकीची ध्येयधोरणे, संबंधित अधिकाऱ्यांच्या चुका आणि शासन प्रशासनाकडून शेतकऱ्यांची झालेली फसवणूक यावर सविस्तर चर्चा सुरू केल्या. नियोजन करून शेळवे येथे या सर्व शेतकऱ्यांची पहिली सहविचार सभा आयोजित केली होती.

   या सभेसाठी कौठाळी,खेड भाळवणी,शेळवे, भंडीशेगाव येथून मोठ्या संख्येने कालवाग्रस्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. शेळवे गावचे माजी उपसरपंच रमेश गाजरे, सरपंच अनिल ज्ञानोबा गाजरे,ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नागटीळक, खेड भाळवणी ग्रामपंचायत सदस्य कल्याण साळुंखे,नामदेव गाजरे,कौठाळी ग्रामपंचायत सदस्य बाळदादा नागटीळक, नितीन पवार,संतोष गाजरे,सुधाकर गाजरे, अरूण आसबे,राहुल गाजरे, शंकर गाजरे,रामदास गाजरे,समाधान गाजरे,सुरज गाजरे,रोहन गाजरे, युवराज गाजरे, सागर साळुंखे, सागर गाजरे, नितीन गाजरे, इकबाल शेख,विट्ठल गाजरे तसेच इतर अनेक कालवाग्रस्त शेतकरी उपस्थित होते, पत्रकार प्रतिनिधी म्हणून संभाजी वाघुले व शैलेंद्र मस्के उपस्थित होते.

कॅनॉलग्रस्त शेतकरी समाधान गाजरे ,बाळदादा नागटीळक,नितीन पवार, रमेश गाजरे, अरूण आसबे यांनी उपस्थित कालवाग्रस्त शेतकऱ्यांना कालव्याचा इतिहास,पाठपुरावा, संबंधित अधिकाऱ्यांच्या चुका,शेतकऱ्यांचे भरून न निघणारे झालेले नुकसान याविषयी मार्गदर्शन केले तसेच भविष्यात करण्यात येणाऱ्या उग्र जनांदोलनाची दिशा स्पष्ट केली.

   बुधवार दि १४ रोजी संबंधित सर्व अधिकारी, आमदार व प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देण्याचे ठरले असून त्यानंतर तालुक्यात ठीक ठिकाणी उग्र आंदोलन छेडण्यात येईल.तसेच जोपर्यंत कालवाग्रस्त शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गप्रमाणे भरीव मोबदल्याची तरतूद होत नाही तोपर्यंत पक्ष,पार्टी,गट-तट बाजूला ठेवून फक्त आणि फक्त शेतकरी माय-बापासाठी एकदिलाने लढण्याचे सर्वांच्या संमतीने जाहीर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: