national

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा संकल्प पूर्ण झाला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा संकल्प पूर्ण झाला आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.

श्रीरामांच्या कोट्यवधी भक्तांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय

आज सनातन संस्कृतीचे नवे पर्व सुरू झाले आहे

नवी दिल्‍ली /PIB Mumbai ,22 जानेवारी 2024 – अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा संकल्प पूर्ण झाल्यामुळे 5 शतकांची प्रतीक्षा आणि प्रतिज्ञा आज पूर्ण झाली आहे असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

X प्लॅटफॉर्मवरील आपल्या पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की,5 शतकांची प्रतीक्षा आणि प्रतिज्ञा आज पूर्ण झाली आहे.प्रभू श्रीरामाच्या कोट्यवधी भक्तांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे. आज जेव्हा आपला रामलल्ला त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान आहे,तेव्हा श्रीरामांच्या असंख्य भक्तांप्रमाणे मीही भारावून गेलो आहे. ही भावना शब्दात टिपणे शक्य नाही असेही शाह म्हणाले. ते म्हणाले की, आमच्या अनेक पिढ्यांनी या क्षणाच्या प्रतीक्षेत मोठे बलिदान दिले,मात्र कोणतीही भीती आणि दहशत श्री रामजन्मभूमीवर पुन्हा मंदिर बांधण्याचा संकल्प आणि विश्वास डळमळीत करू शकली नाही.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा संकल्प पूर्ण झाला असून त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो असे शाह म्हणाले .

केंद्रीय गृहमंत्री पुढे म्हणाले की, या शुभदिनी मी त्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो ज्यांनी हा संघर्ष आणि जिद्द शतकानुशतके जिवंत ठेवली,अनेक अपमान आणि यातना सहन केल्या मात्र धर्माचा मार्ग सोडला नाही.विश्व हिंदू परिषद,हजारो महान संत आणि असंख्य ज्ञात-अज्ञात लोकांच्या संघर्षाचे आज सुखद आणि यशस्वी फळ मिळाले आहे. हे विशाल श्री रामजन्मभूमी मंदिर युगानुयुगे शाश्वत आणि अविनाशी सनातन संस्कृतीचे अद्वितीय प्रतीक राहील असे शाह म्हणाले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *