कुर्डूवाडी नगरपरिषदेस मनसे ने ठोकले टाळे

कुर्डूवाडी नगरपरिषदेस मनसे ने ठोकले टाळे The MNS avoided hitting the Kurduwadi Municipal Council

कुर्डूवाडी/राहुल धोका – कुर्डूवाडी नगरपरिषदेस तब्बल १२ वर्षानंतर पुन्हा टाळे ठोकले असून त्या मुळे संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली होती. शिवसेनेनंतर असे आंदोलन मनसे ने केले असून नगरपालिकेतील सततची मुख्याधिकारी यांची अनुपस्थिती , भुयारी गटाराचे निकृष्ट काम , नागरिकांना होणारा सततचा त्रास यामुळे रागाचा उद्रेक झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुर्डूवाडी नगरपालिकेस टाळे ठोकले होते.

कुर्डुवाडी शहराध्यक्ष ओंकार चौधरी यांच्यावतीने कुर्डूवाडी नगर परिषदेच्या भुयारी गटारीचे निकृष्ट कामामुळे कुर्डूवाडी शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे कुर्डुवाडी नगर परिषदेतील नगराध्यक्ष, नगरसेवक, ठेकेदार, मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत निवेदन यावेळी देण्यात आले आहे.

  यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब टोणपे, तालुकाध्यक्ष सागर लोकरे,तालुका उपाध्यक्ष सागर बंदपट्टे,विधानसभा अध्यक्ष आकाश लांडे, कुर्डुवाडी शहर संघटक अमोल घोडके, शहर उपाध्यक्ष उपाध्यक्ष गणेश चौधरी ,युवा मनसे शहराध्यक्ष युवराज कोळी, शहर सरचिटणीस सोमनाथ पवार, बेंबळे विभाग प्रमुख सागर गरडे, अनिकेत डिसले ,ओमकार आडगळे ,अविनाश तोरणे, राणा राजपूत,महिला तालुकाध्यक्ष मीराताई शिंदे , कुर्डवाडी शहराध्यक्ष रेखा चांदणे आदीसह  महिला आणि नागरिक यात सहभागी झाल्या होत्या. 

कुर्डुवाडीतील रस्त्यावरून नागरिकांना चालता येणे शक्य नाही.अनेक जेष्ठ नागरिक रस्त्यावर पडत आहेत. सर्वत्र चिखल आहे. रस्त्याचे काम दोन वर्षा पासून चालू आहे ते काम कधी पूर्ण होणार ? याकामा विषयी सर्वत्र नाराजी आहे.
-जयश्री करंजकर ,सचिव : राजमाता जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला संघटना

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: