गुन्ह्यामध्ये अडकवून नाहकपणे त्रास देण्याचा प्रयत्न – शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ

याबाबतीत लक्ष घालून तातडीने संभाजी शिंदे यांना खोट्या गुन्ह्यातून मुक्त करावे – अनिल कोकीळ

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,१६/०८/२०२३ – शिवसेना सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख आणि भाळवणी जिल्हा परिषद गटाचे पंचायत समिती सदस्य तसेच पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर सदस्य संभाजी शिंदे , यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून जाणीवपूर्वक त्रास देत असल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोलापूर जिल्ह्याच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत.घडलेल्या घटनेच्या ठिकाणी ते स्वतः नसतानासुद्धा होते असे दाखवून घडलेल्या घटनेच्या दिवशी एफआयआर नोंद न करता प्लॅनिंग करून दुसऱ्या दिवशी त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अडकवून नाहकपणे त्रास देण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होत आहे .त्याबद्दल प्रचंड संताप सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी याचा तीव्र निषेध केला असून याबाबत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक यांना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने निवेदन देऊन याबाबतीत लक्ष घालून तातडीने संभाजी शिंदे यांना खोट्या गुन्ह्यातून मुक्त करावे अशा प्रकारचे निवेदन देण्यात येणार आहे असे सांगून जर जाणीवपूर्वक हे पुन्हा करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेतर्फे मोठे आंदोलन छेडण्यात येईल असेही सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: