केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय-सौर पीव्ही मॉड्यूलचा उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेत समावेश

उच्च कार्यक्षमतेच्या सौर पीव्ही मॉड्यूलच्या राष्ट्रीय उपक्रमाचा उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेत समावेश करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

नवी दिल्ली,7 एप्रिल 2021- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च कार्यक्षमतेचे सौर पीव्ही मॉड्यूलच्या राष्ट्रीय उपक्रमाचा उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला.

 या उपक्रमातून गिगावॅट स्तराच्या उच्च कार्यक्षमतेच्या सौर पीव्ही मॉड्यूलच्या उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी 4,500 कोटी रुपयाच्या अतिरिक्त खर्चासाठी ही मंजुरी देण्यात आली.

देशांतर्गत उत्पादन क्षेत्र हे आयात केलेल्या सौर सेल्स आणि मॉड्यूलच्या परिचालन क्षमतेपुरते मर्यादित असल्यामुळे, सौर क्षमता ही मोठ्या प्रमाणावर आयात केलेल्या सौर फोटोव्होल्टिक सेल्स आणि मॉड्यूल्सवर अवलंबून आहे. उच्च क्षमतेच्या सोलर पीव्ही मॉड्यूलचा राष्ट्रीय उपक्रम हा विद्युतक्षेत्रासारखाच आयातीवरील अवलंबित्व कमी करत आहे, त्याचप्रमाणे आत्मनिर्भर भारत या उपक्रमालाही सहाय्यकारी ठरत आहे.

    देशांतर्गत सौर फोटोव्होल्टिक उत्पादक हे स्पर्धात्मक लिलाव प्रक्रियेतून निवडले जातील. सौर फोटोव्होल्टिक उत्पादन प्रकल्प सुरू केल्या पासून पाच वर्ष उच्च क्षमतेच्या सौर मॉड्यूल्सच्या विक्रीवर हा उत्पादन आधारित प्रोत्साहन निधी दिला जाईल. उत्पादकांना उच्च क्षमतेच्या सौर फोटोव्होल्टिक मॉड्यूल्ससाठी गौरवण्यात येईल तसेच त्यांच्या मालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध होईल.त्यामुळे वाढीव मॉड्यूल क्षमते बरोबरच स्थानिक बाजारपेठेनुसार उच्च मूल्य देण्याच्या क्षमतेवरही प्रोत्साहन निधी अवलंबून असेल.

या योजनेतून होणारे फायदे पुढील प्रमाणे असतील –

अतिरिक्त 10,000 मेगावॅट क्षमतेचे एकत्रित सौर पीव्ही उत्पादन प्रकल्प
सौर पीव्ही उत्पादन प्रकल्पात 17,200 कोटी रुपयांची प्रत्यक्ष गुंतवणूक
बॅलन्स ऑफ मटेरियल साठी पाच वर्षापर्यंत 17,500 कोटी रुपयांची आवश्यकता
30,000 जणांना थेट तर जवळपास 1,20,000 जणांना अप्रत्यक्ष रोजगार
याद्वारे दरवर्षीच्या सुमारे 17,500 कोटीं रुपयांच्या आयातीला पर्याय
सौर मॉड्यूलमध्ये उच्च दर्जाची क्षमता प्राप्त करण्यासाठी संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन

केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय-सौर पीव्ही मॉड्यूलचा उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेत समावेश Union Cabinet Decision-Solar PV Module Production-based Incentive Scheme Inclusion

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: