आषाढी वारीसाठी टीव्हीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची २४ तास ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध

आषाढी वारीसाठी टीव्हीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची २४ तास ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध
24 hours online darshan facility of Shri Vitthal Rukmini Mata available on TV for Ashadi Wari

आषाढी वारीसाठी ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध

    पंढरपूर / नागेश आदापुरे,12/07/2021 - पंढरपूर आषाढी यात्रा दर वर्षी आषाढ शुद्ध एकादशी या दिवशी भरते. यावर्षी आषाढी यात्रा मंगळवार दि.२०/०७/२०२१ रोजी संपन्न होणार आहे या कालावधीमध्ये आषाढ शुद्ध॥१ दि . ११/७/२०२१ ते आषाढ शुद्ध॥१५ दि २४/०७/ २०२१ असा राहणार आहे आषाढी यात्रा कालावधीमध्ये" श्री "चे दर्शन 24 तास उपलब्ध असते त्यानुसार आषाढ शुद्ध२,सोमवार दि.१२/ ०७/२०२१रोजी महानैवद्यानंतर श्रीं चा पलंग काढून श्री विठ्ठलस लोड व रुक्मिणी मातेस तक्या देण्यात आला. 

    यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर,मंदिर समिती सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, श्रीमती शकुंतला नडगिरे ,विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते. 

     आजपासून श्री ना करण्यात येणारी काकड आरती,पोषाख, धुपारती ,शेजारती इत्यादी रोजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवद्य व गंधाक्षदा हे राजोपचार प्रक्षाळपूजेपर्यंत सुरू

राहतील सध्याच्या स्थितीत कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य शासनाचे आदेशानुसार भाविक भक्तांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन बंद आहे मात्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संकेत स्थळावर – WWW Vittehlrukminmandir.orğ, मोबाईल अँप – श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर अथवा जीवो टिव्ही इत्यादीवर श्रीं चे २४ तास ऑनलाइन पद्धतीने दर्शन उपलब्ध असणार आहे.

   विठ्ठल-रुक्मिणीच्या भाविक भक्तांनी आषाढी यात्रा काळामध्ये २४ तास "श्री " दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: