शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार शिव संपर्क अभियान शुभारंभ

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसंपर्क अभियान शुभारंभ Launch of Shiv Sampark Abhiyan under the guidance of Shiv Sena chief Uddhav Thackeray
 पंढरपूर, १३/०७/२०२१ - शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसंपर्क अभियान शुभारंभ आज सोलापुर जिल्ह्यातील पंढरपुर शहरातून करण्यात आला.

   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील शिवसंपर्क अभियान हे शिवसेना प्रत्येक घराघरांत व मनामनात रुजविण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी असून शिवसैनिकांनी संकटाच्या काळात प्रत्येक घराघरात जाऊन जनतेच्या अडचणी सोडवत पक्षासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे त्या प्रमाणे सर्वांनी काम करावे असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले.

यावेळी शिवसंपर्क अभियानानिमित्ताने शिवसेना सोलापुर जिल्हा प्रमुख पंढरपुर विभाग संभाजी शिंदे,सोलापुर जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश साठे, भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, तालुका प्रमुख महावीर देशमुख,पंढरपुर शहर प्रमुख रविंद्र मुळे, शिवसेना पंढरपुर – मंगळवेढा समन्वयक संजय घोडके जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे,सिद्धनाथ कोरे, शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे, सचिन बंदपट्टे, विनय वनारे, पोपट नाना सावतराव, बाबा अभंगराव, समाधान अधटराव, अविनाश वाळके, तानाजी मोरे, शिवसेना शहर प्रसिद्धी प्रमुख अमित गायकवाड, शिवसेना विभाग प्रमुख पंकज डांगे-कोळी, सूरज गायकवाड,अरुण कांबळे, ईश्वर साळूंखे, मनोज शिंदे, महेश मेहेर यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: