General news

युवा सेनेकडून पंढरपूरात 21 फुटी श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन करुन महाप्रसादाचं वाटप

युवा सेनेकडून पंढरपूरात 21 फुटी श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन करुन महाप्रसादाचं वाटप

आयोध्येतील श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी पंढरपुरातील झेंडे गल्ली,अनिल नगर परिसरात जल्लोष

पंढरपुर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.22/01/2024 : तब्बल पाचशे वर्षानंतर श्रीराम जन्मभुमी आयोध्या नगरीत प्रभु श्रीरामचंद्राच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना भव्य अशा राम मंदिरात करण्यात आली. यानिमित्त पंढरपूर येथील झेंडे गल्ली आणि अनिल नगर परिसरात युवा सेना व श्रीनिवास उपळकर मित्र परिवाराच्या वतीने दि. 22 जानेवारी 2024 रोजी 21 फुटी श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन करुन नागरिकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं.

युवा सेनेचे पंढरपूर शहर प्रमुख श्रीनिवास उपळकर यांनी झेंडे गल्ली व अनिल नगर परिसरात श्रीरामाच्या 21 फुटी उंचीच्या प्रतिमेचे पुजन करुन याठिकाणी श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा केला.श्रीरामप्रभुंच्या प्रतिमेचे पुजन समाजसेवक गणेश भिंगारे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मयुरी भिंगारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक रामभाऊ भिंगारे, माजी शिवसेना विभाग प्रमुख अशोक उपळकर,शिवसेना विधानसभा प्रमुख रणजीत कदम, शिवसेना पंढरपूर शहर समन्वयक लंकेश बुराडे, युवासेना पंढरपूर शहर समन्वयक स्वप्नील गावडे,कृष्णा कवडे, अनंत फडतरे,संदीप माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

परिसरातील नागरिकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रेरणेने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आजचा उत्सव साजरा करत असताना विशेष आनंद होत असुन पुढील काळात समाजसेवा आणखी जोमाने करण्याची उर्जा आज मिळाली असल्याची प्रतिक्रिया युवा सेनेचे शहर प्रमुख श्रीनिवास उपळकर यांनी दिली.

यावेळी मार्गदर्शक दत्तात्रय वाडेकर, बबन नेहतराव, शिवभक्त ग्रुप अध्यक्ष समाधान पोळ, तानाजी गुंजाळ, आनंद शिंदे, राजेश नेमाडे, महेश परदेशी, विशाल डोंगरे, प्रथम भिंगारे, निलेश उपळकर, सागर उदगिरकर, भालेश टमटम, निरज उपळकर, दत्ता पवार, नाना पवार, सुरज गंजकर, महेश कोरके, महेश पिसाळ, शैलेश उदगिरकर, महेश डोळसे, ऋषीकेश वाडेकर, श्रीवल्लभ उपळकर, दत्तात्रय चव्हाण, बापु दुपडे, माऊली शिंदे,बबलू वैरागकर,शुभम वाडेकर, महेश तमखाने,यश भिंगारे,दत्ता सुतार, हनुमंत तमखाने, रितेश जगताप, विशाल नेमाडे, छोटू क्षिरसागर, आनंत कोळेकर, यांच्यासह शिवछत्रपती तालीम मित्र मंडळ, शिवबाराजे मित्र मंडळ, सुदर्शन मित्र मंडळ व गणेश भिंगारे मित्र परिवार व श्रीनिवास उपळकर मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *