State news

पंढरपूरात होणार अखिल भारतीय विद्यार्थी परिषद प्रदेश कार्यकारिणी बैठक

२७ व २८ जानेवारी रोजी पंढरपूरात होणार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची प्रदेश कार्यकारिणी बैठक

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24/01/2024 – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक दि २७ व २८ जानेवारी रोजी पंढरपूर येथील एस.के.एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी येथे होणार आहे. ही बैठक दि २७ जानेवारी ला सकाळी १०:०० वाजता सुरू होऊन २८ जानेवारी ला सायंकाळी ५:०० वाजता संपेल.

अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या सर्व कार्यक्रम, आंदोलने, उपक्रम, संमेलन, कार्यशाळा, इत्यादी गोष्टींचा आढावा घेतला जाणार. सामाजिक सद्यस्थिती व त्याचप्रमाणे सध्याची चालू असलेल्या शैक्षणिक सद्यस्थिती यामध्ये नवीन शैक्षणिक धोरण, शैक्षणिक योजना व आंदोलने या विषयांवर चर्चा होणार आहे. विद्यार्थी परिषदे मार्फत वर्षभरात चालवले जाणाऱ्या कार्यक्रम, उपक्रम अशे अनेक आगामी कार्यक्रम, उपक्रम त्यामध्ये राष्ट्रीय विद्यार्थी दिन, समरसता दिन, युवक सप्ताह, गुरुपौर्णिमा, उद्यमिता सप्ताह, अभियंता दिन, राणी दुर्गावती जयंती, भगिनी निवेदिता जयंती, जनजाती गौरव दिन, स्री शक्ती दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, सहल, शिबीर, करियर यात्रा अशा अनेक आगामी कार्यक्रमाबाबत चर्चा केली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे विद्यार्थी जीवन हे आनंदमय व सार्थक कसे करता येईल व कार्यकर्त्यांच्या विकासाकरता प्रदेश अभ्यास वर्ग, जिल्हा अभ्यास वर्ग, जिल्हा स्तरीय प्रशिक्षण, अभ्यास मंडळ, सामाजिक उपक्रम, वैचारिक उपक्रम ह्या गोष्टीवर देखील चर्चा केली जाणार आहे. या बैठकीमध्ये परिसर चलो अभियान संदर्भात चर्चा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मार्च मध्ये होणाऱ्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय डिपेक्स ह्या कार्यक्रमाबद्दल चर्चा केली जाणार आहे.

या प्रदेश कार्यकारिणी बैठकीला पश्चिम महाराष्ट्र प्रांतातून १५० हुन अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक येणार आहेत. या बैठकीस राष्ट्रीय कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. प्रशांत साठे, पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय संघटनमंत्री देवदत्त जोशी, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचे संघटनमंत्री गितेश चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा.निर्भयकुमार विसपुते सर व पश्चिम महाराष्ट्र प्रदेशमंत्री ॲड अनिल ठोंबरे प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत. या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीची तयारी पंढरपूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पार पाडत आहेत. या बैठकीच्या व्यवस्थेसाठी पंढरपूर जिल्ह्यातील ५० हुन अधिक कार्यकर्ते विविध गटांमध्ये काम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *