Live Radio

एकल महिलांना त्रास देणाऱ्या विकृत समाज कंटकांविरुध्द कडक कारवाईचे निर्देश – विधान परिषद उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे Strict action against perverted social thorns harassing single women – Legislative Council Deputy Speaker Dr.Neelmathai Gorhe
मुंबई /पुणे, १३/०७/२०२१ - बीड जिल्ह्यामध्ये एका शेतकरी महिलेवर जमिनीच्या वादावरून तिच्याकडे वाईट दृष्टीने बघायचे आणि तिच्या कडून विषय सुखाची मागणी करण्याचा अत्यंत निंदनीय असा प्रकार घडलेला आहे. या संदर्भात पोलिस अधिकाऱ्यांशी विधान परिषद उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे dr nilam gorhe यांनी चर्चा केली आहे.यात  एक दिसून येते की आरोपी अजून सापडलेले नाहीत. हे दोन्ही आरोपी पोलिस असून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. या दृष्टीने जे पोलीस निरीक्षक तपास करत आहेत त्यांना विधान परिषद उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी निर्देश दिले आहेत. 

  सदर आरोपींना पकडण्याबरोबरच त्यांच्या बाकीच्या नातेवाईकांनी त्रास देऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जी दबंग कुटुंब आहे ती या सर्वसाधारण गरीब परिस्थितीतील  शेतकरी ,खास करून महिलांना त्यातही एकल महिलांना त्रास देण्याची विकृत भूमिका हे समाज कंटक बऱ्याच ठिकाणी घेत असतात. अशा ठिकाणी पोलिसांनी ,ग्रामस्थांनी महिला दक्षता समिती,ग्राम रक्षक समिती यांच्यामार्फत या महिला एकल कुटुंबीयांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. जे गरीब लोक आहेत त्यांच्याबरोबर उभे राहायला पाहिजे.गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई shambhu raje Desai आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील Dilip valse Patil यांच्याकडे तालुका स्तरावरील महिला दक्षता समित्या कार्यान्वित कराव्यात याबाबत विधान परिषद उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी निवेदन दिले आहे. तसेच पोलिस अधीक्षकांशीही मी बोलणार आहे असेही ना.डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी सांगितले. 

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *