माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंकडुन विचारपूस

माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंकडुन विचारपूस Union Minister of State Ramdas Athawale inquires about the health of former MP Prakash Ambedkar

मुंबई दि. 13 – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाल्याचे कळताच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांचे लहान भाऊ भीमराव आंबेडकर यांना दूरध्वनी करून आस्थेने माहिती घेतली. प्रकाश आंबेडकर रुग्णालयात असून त्यांना लवकर डिस्चार्ज मिळेल. ते घरी आल्यानंतर त्यांची भेट घेऊ असे ना. रामदास आठवले यांनी भीमराव आंबेडकर यांना सांगितले.भीमराव आंबेडकर यांनीही ना. रामदास आठवले यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

  प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar हे वंचित बहुजन आघाडी तर रामदास आठवले  Ramdas Athawale हे रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वाचे आंबेडकरी जनतेवर गारुड करून आहेत. या दोन नेत्यांची राजकीय वाटचाल वेगवेगळी राहिली असली तरी दोघांमध्ये आपलेपणाची जाणीव असल्याची प्रचिती दोघा नेत्यांनी दाखविली आहे.

  केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या मातोश्री हौसा आई आठवले यांचे 2018 मध्ये निधन झाले तेंव्हा मातोश्री हौसा आई यांच्या अंत्ययात्रेत प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिले होते.

   आता प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी झाली असल्याचे कळल्यानंतर ना. रामदास आठवले यांनी आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत राजकीय वाटचाल काहीही असो पण आपलेपणा जोपासत प्रकृतीत लवकर चांगली सुधारणा होवो असा भीमराव आंबेडकर यांना दूरध्वनी करून निरोप दिला. 

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: