आ.समाधान आवताडे बांधून देणार मुस्लिम समाजाच्या छोटा कब्रस्थानमध्ये दोन रुम
आ समाधान आवताडे बांधून देणार मुस्लिम समाजाच्या छोटा कब्रस्थानमध्ये दोन रुम MLA Samadhan Avtade will build two rooms in a small cemetery of the Muslim community
शहीद टिपू सुलतान युवक संघटनेच्या मागणीस यश
पंढरपूर – पंढरपूर शहरातील मुस्लिम समाजाची अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. त्यामध्ये सांगोला रोडवरील छोटा कब्रस्थानमध्ये दफन विधीचे सामान ठेवण्यासाठी दोन रूम बांधण्याच्या मागणीसाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्याकडे शहीद टिपू सुलतान युवक संघटना व मुस्लिम समाजातील बांधवांकडून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती.त्यास यश आले असून लवकरच त्याठिकाणी आमदार निधीतून दोन रूम बांधून देण्यात येतील असे आश्वासन आ.आवताडे यांनी दिले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी यांनी दिलेली आहे. यावेळी नगरसेवक डि.राज सर्वगोड, बाबा ग्रुपचे संस्थापक उत्तम चव्हाण, आदम बागवान उपस्थित होते.
समाधान आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीत विजय संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर शहरातील बडा कब्रस्थान व छोटा कब्रस्थान यामध्ये अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. त्या ठिकाणी दफन विधीसाठी आल्यानंतर मुस्लिम समाज बांधवांची गैरसोय होत आहे.याची माहिती संघटना व मुुस्लिम बांधवांच्यावतीने आ.आवताडे यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ सकारात्मकता दर्शवून दोन रूम बांधून देणार असल्याचे सांगितले.