राजकीय newsराजकीय न्यूज

8 तास शेतकर्यांना वीज द्या अन्यथा उग्र आंदोलन करू – सचिन आटकळे

8 तास शेतकर्यांना वीज द्या अन्यथा उग्र आंदोलन करू – सचिन आटकळे

भटुंबरेत स्वाभिमानी चा रास्ता रोको

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –मौजे भटुंबरे पंढरपूर गुरसाळे रोडवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गुरसाळे व पंढरपूर बंधार् यावरील सुमारे 7 गावांना 8 तास लाईट द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आटकळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले.

उजनी धरणातून सोलापूर व भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात आले होते पाणी सोलापूर ला पोहचून आठवडा झाला तरीही गुरसाळे व पंढरपूर बंधाऱ्यावर असलेल्या नदीकाठच्या गावांचा वीज पुरवठा खंडित करत फक्त दोन तास सुरु ठेवला आहे त्यामुळे जनावरांच्या पिण्याचा आणि शेतीचा विषय अतिशय बिकट झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे.

नदी काठच्या गावातील पिण्याच्या, जनावराच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असुन आता तोंडाशी आलेली शेतकऱ्याची पिके पाणी असतानाही पाण्यावाचून करपू लागली आहेत. उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे त्यामुळे जनावरांना पिण्यासाठी व शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते परंतु वीज पुरवठा खंडित केल्यामुळे या सगळ्या गोष्टी अडचणीच्या करत आहेत. कर्नाटकच्या शेतकऱ्यांना सरकार चोवीस तास वीज पुरवठा करतो त्यामुळे आज बंधाऱ्यातून आरक्षित असतानासुद्धा ते शेतकरी 24 तास पाणी उपसा करत आहेत परंतु आपल्या पंढरपूरमधील शेतकऱ्यांना मात्र प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून वीज पुरवठा खंडित करून वेठीस धरले जात आहे .शेतकऱ्यांना वीज पुरवठा करायचा नसेल तर तसे शासनाने जाहीर करावे व शेतातल्या सर्व पिकाची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून मग खुशाल लाईट बंद ठेवावी आमची काही हरकत नाही.

या बंधार्यावर गुरसाळे, शिरढोण, चिंचोली भोसे, भंटुबरे इसबावी, व्होळे, या गावाचा समावेश असून या गावातील शेतकर्याची पिके धोक्यात आली आहेत.

या भागातील शेतकर्यांच्या पिकाचा आणि जनाराच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला असून या भागातील शेतकर्यांचा विद्युत पुरवठा 8 तास करावा अन्यथा उग्र आंदोलन करणार असल्याचे स्वाभिमानी चे सचिन आटकळे यांनी सांगितले आहे.या आंदोलना दरम्यान वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन कडून बंदोबस्त लावण्यात आला होता.

या आंदोलनाला स्वाभिमानी चे शहाजहान शेख,पार्थ सुरवसे,दिपक शिंदे,शंकर गोडसे, विठ्ठल पाटील,मोहन सुधाकर कवडे,सागर गोडसे, शिवाजी पवार, परमेश्वर पवार, नाना गाढवे,रामचंद्र कारंडे,रमेश पवार,तानाजी धुमाळ, शिवाजी नागटिळक,सुदाम पवार, सुहास पवार, पंकज कन्हेकर ,सागर पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *