हवालदार विक्रम राजाराम नाईकनवरे यांना पितृशोक

हवालदार विक्रम राजाराम नाईकनवरे यांना पितृशोक

पंढरपूर दि 14 :- येथील भाई भाई चौक ,संतपेठ मधील रहिवासी मिलिटरीमधील हवालदार विक्रम राजाराम नाईकनवरे यांचे वडील कै राजाराम महादेव नाईकनवरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते .त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा आमदार समाधान अवताडे यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन सांत्वन केले.कै राजाराम महादेव नाईकनवरे हे एमएसईबी चे निवृत्त कर्मचारी होते. पंढरपूर येथील संतपेठेत राहून संतासारखं सुसंस्कारित जीवन जगता येत,हे कै राजाराम महादेव नाईकनवरे यांनी सिद्ध करुन दाखवलं.विद्यार्थी दशा संपल्या संपल्या वीज खात्यात रोजंदारीवर कामाला लागले,त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना त्याच खात्यात वायरमनची नोकरी लागली.प्रामणिक वायरमन ते लाईनमन असा नोकरीचा प्रदीर्घ प्रवास करुन ते सेवानिवृत्त झाले.सेवेच्या कालावधीत आणि एकूण जीवनामध्ये त्यांच्या गोड स्वभावामुळे हजारो माणसं त्यांना जोडली गेली.ते बोलू लागल्यानंतर ऐकतच रहावे असे वाटे.कायम हसऱ्या चेहऱ्याने समोरच्याला मार्गदर्शन करायचे. नोकरीत असताना युनियनचे अध्यक्ष,पतसंस्थेचे चेअरमन अशी पदे त्यांनी भूषविली होती .

विविध वृत्तपत्रांचे,वाहिन्यांचे,पोर्टलचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवरांनीही नाईकनवरे यांच्या घरी भेट देऊन हवालदार विक्रम राजाराम नाईकनवरे आणि कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले.

यावेळी पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेवक संजय निंबाळकर,नगरसेवक बजरंग देवमारे, भिमराव वाघमारे,कमलबाई महादेव नाईकनवरे, उमेश सर्वगोड, जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: