पंढरपूर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्याकरीता प्रयत्न करणार

पंढरपूर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्याकरीता पंढरपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष ऍड.राजेश भादुले व महाराष्ट्र वीरशैव सभेचे शहराध्यक्ष विशाल आर्वे यांनी उचलली आश्वासक पावले Efforts will be made to control the number of coronary heart disease patients in Pandharpur taluka

पंढरपूर – पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोना पेशंटच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. हे वाढते रुग्ण पाहता तालुक्यातील नागरिकांची संभ्रमावस्था झालेली आहेच त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेवर देखील प्रचंड ताण पडलेला आहे. पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना दिलासा देण्याकरिता जे जे शक्य आहे ते ते करण्याकरता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरविंद गिराम यांची अँड. राजेश भादुले व विशाल आर्वे यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांचेकडून माहिती घेतली. प्रशासन पातळीवर काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्या समस्यांचे निराकरण करण्याकरीता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्वीय सहाय्यक तसेच सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना फोन लावून या सर्व समस्या त्यांच्यापर्यंत तत्काळ पोहचविण्याचे काम यावेळी भादुले वकील यांनी केले.

त्यात १} रुग्णांची वाढती संख्या पाहता कोव्हिड केअर सेंटर म्हणून नव्याने काही संस्था ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. परंतु, M.I.T. कॉलेज व आदी संस्थांचे पूर्वीचेच बील अद्यापही पेड न केल्यामुळे अशा संस्था आता सहकार्य करण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यांचे पूर्वीचे पेंडिंग बील त्वरीत अदा करण्यात करावे.
२} कॉटेज हॉस्पिटलमध्ये कोरोना पेशंटवर उपचार करण्याकरीता पन्नास बेडची मर्यादा असताना, सद्यस्थितीत तिथे तब्बल शंभर पेशंटवर उपचार करण्यात येत असल्याने तेथील कर्मचाऱ्यांवर खुप ताण पडत आहे. म्हणुनच या ठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी वर्गाची उपलब्धता करून देण्यात यावी.
३} सध्या आपल्या पंढरपूर शहरासाठी एक दिवसाआड केवळ १०० लस पुरवल्या जात आहेत.कोरोनाची साथ आटोक्यात आणण्याकरीता लसीकरणाची मोहीम वाढवणे अत्यावश्यक झाले आहे. म्हणूनच पंढरपूर शहराकरीता रोज पाचशे लसी पुरविण्यात याव्यात.

   अशा मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम भादुले वकील यांनी केले आणि वैद्यकीय, प्रशासकीय अधिकारी यांना वेळोवेळी सहकार्य करण्याबाबत आश्वस्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: