General news

पंढरपूर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार

पंढरपूर शहराला दि. 30 जानेवारीपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.29/01/2024 –पंढरपूर शहराला दगडी पुलाजवळ असलेल्या बंधाऱ्यामधून पाणी पुरवठा केला जातो परंतु सद्यस्थितीमध्ये उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चालू वर्षांमध्ये पर्जन्यमान कमी झाल्याने उजनी धरणातील पाणीसाठा कमी झालेला आहे. उजनीची पाणी पातळी लक्षात पंढरपूर शहरातील पाणी पुरवठयामध्ये कपात करणे आवश्यक आहे .

पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव 

तसेच दगडी पुलाजवळील असलेल्या बंधाऱ्यांमध्ये केवळ ४० ते ५० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे.त्यामुळे पंढरपूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला असून दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी रुळाच्या खालील भागास व दि.३० जानेवारी २०२४ पासून रुळाच्या वरच्या भागाला पाणी पुरवठा होईल. त्यानंतर दररोज एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.

पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांनी पाण्याची सद्यस्थिती पाहता काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *