राजकीय न्यूज

लक्ष्मी टाकळी मधील अंतर्गत पाणीपुरवठा व ड्रेनेज पाईपलाईन कामाचा शुभारंभ

लक्ष्मी टाकळी प्रभाग क्रमांक तीनमधील अंतर्गत पाणीपुरवठा व ड्रेनेज पाईपलाईन कामाचा शुभारंभ

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- दि 29/1 /2024 रोजी पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी प्रभाग क्रमांक तीनमधील अंतर्गत पाणीपुरवठा व ड्रेनेज पाईपलाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला.

त्यावेळी सरपंच संजय साठे ,उपसरपंच महादेव पवार ,माजी सरपंच विजयमाला सचिन वाळके, ग्रामपंचायत सदस्य औदुंबर ढोणे , ग्रामपंचायत सदस्य रूपाली कारंडे, सागर कारंडे, मंगेश कुलकर्णी यांच्यासह प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिक व सहकारी उपस्थित होते .

एक पाऊल विकासाच्या दृष्टीने आपला गाव आपला विकास ही संकल्पना घेऊन दररोज एक नवीन नवीन विकास कामाचा भूमिपूजन होत आहे अशी माहिती सरपंच संजय साठे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *