General news

नागेश्वर विद्यालय आंबवडे येथे दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न 

नागेश्वर विद्यालय आंबवडे ता.भोर जिल्हा पुणे येथे 1996 – 1997 च्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न 

आंबवडे ता.भोर /ज्ञानप्रवाह न्यूज –रविवार दि. 28/01/2024 रोजी नागेश्वर विद्यालय आंबवडे ता.भोर जिल्हा पुणे येथे 1996 – 1997 च्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी शिक्षकांचे स्वागत करुन करण्यात आली.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व सरस्वती,स्वामी विवेकानंद,कै बापुजी साळुंखे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर सर्व शिक्षकांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रथम सर्व कैलासवासी शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक वाळंजकर यांनी केले.त्यानंतर सर्वांनी स्वतःची ओळख करून दिली.त्याचबरोबर नागेश्वर विद्यालय आंबवडे मधील आठवणींना उजाळा दिला.

त्यानंतर शिक्षक शिवतरे एस एस,धुमाळ बी एस, रसाळ जी डी, दाभोळे एन एस, बोहिटे टी जे,पाटिल व्हि एम,बारदेसकर आर जे, बोराटे जी जे (स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजिव सेवक) मुख्याध्यापक थोपटे एस एल,क्लार्क वाळंजकर व्हि डी यांनी जमलेल्या माजी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

कार्यक्रमाची सांगता सायंकाळी चार वाजता तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर पुन्हा एकदा श्री दाभोळे सर यांच्या आवाजात वंदेमातरम म्हणून झाली.

हा स्नेह मेळावा पार पाडण्यासाठी सर्वच विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहकार्य केले. पृथ्वीराज ढुमे,महेन्द्र देवघरे,संजय फाटक, संजय घोरपडे,शत्रुघ्न घोलप,अंकुश घोलप, सौ वर्षा भोसले,दिपक घोरपडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *