दिन विशेष

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

मौन पाळत हुतात्म्यांच्या स्मृतीस अभिवादन

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० जानेवारी २०२४ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, विधीमंडळ सचिव-१ जितेंद्र भोळे, मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्यासह विधीमंडळ अधिकारी व कर्मचारी वर्गाने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

तत्पुर्वी, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधीमंडळ सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी हुतात्मा दिनानिमित्त दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून मौन पाळत हुतात्म्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

गांधीजींच्या सत्याग्रह, दांडी यात्रा यांमधून जगभरातील लोकांनी प्रेरणा घेतली आहे. महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानाचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायमच आदर करत आले आहेत.सर्वांनी स्वच्छता व श्रमसंस्कारा च्या माध्यमातून महात्मा गांधींच्या स्मृतीस अभिवादन करावे असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *