न्यायतीर्थ बाल ब्रम्हचारी पंडितांचार्य विमलताई मुराबटे यांचे दुःखद निधन

न्यायतीर्थ बाल ब्रम्हचारी पंडितांचार्य विमलताई मुराबटे (भोज) यांचे दुःखद निधन Tragic demise of Nyayatirtha Bal Bramhachari Panditancharya Vimaltai Murabate (Bhoj)
  सांगली -जैन धर्म,तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासू  विमलताई यांचे हुपरी येथे दि.14/07/2021 रोजी सायंकाळी 6.35 वा. दुःखद निधन झाले. त्या न्यायतीर्थ होत्या.कारंजा येथे आश्रमाच्या संचालिका म्हणून कार्य 30 वर्षे केल्या होत्या . वीर सेवा दल, वीर महिला मंडळ धार्मिक पाठशाळा शिक्षकांना उत्तमपणे शिकवीत होत्या. धार्मिक ज्ञानातील कोणत्याही शंकेचे निरसन ते सहज करीत . देशातील अनेक साधू संतांना, अर्यिका माताजींना धर्म ज्ञानाचे धडे दिले आहेत. वीर सेवा दलाच्या हजारो मुलांना उत्तम धर्म ज्ञान ,संस्कार व्हावेत म्हणून सर्व शिबिरातून तळमळीने प्रशिक्षण देत होत्या.कुंथलगिरी येथे शिबिरातून त्यांच्या धर्म शिक्षणातून अनेक कार्यकर्ते निर्व्यसनी होऊन ब्रह्मचारी व्रत घेतले.काहींनी मुनीं दीक्षा, अर्यिका दीक्षा घेतल्या आहेत.24 तासातील 18 तास धर्मचर्चेतून प्रबोधन करीत होत्या.

आमच्या पाटील कुटुंबियांना आत्मीयतेने धर्मात सांभाळून घेऊन स्थिर केल्या.आमच्या वडिलांची सलेखना उत्तम पार पाडणारे बा. ब्र. विमल ताई गेल्याने जैन समाजाचे ,दक्षिण भारत जैन सभा, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.
विमल ताई यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच जीनेश्वर चरणी प्रार्थना .

  • प्रा.डी.ए.पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: