राजकीय न्यूज

अजितदादांनी केली श्रीकांत शिंदे यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या धाराशिव लोकसभेच्या निरीक्षकपदी निवड

पंढरपूरच्या श्रीकांत शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी युवकची मोठी जबाबदारी

अजितदादांनी केली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या धाराशिव लोकसभेच्या निरीक्षकपदी निवड

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्ता ते प्रदेश सरचिटणीस अशी उंच भरारी घेणारे पंढरपूरचे श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीत झालेल्या राजकीय बंडानंतर विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जोरदारपणे समर्थन केले. त्यामुळे अजितदादांनी देखील श्रीकांत शिंदे यांच्यावर आधी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली. आता त्यात आणखी भर पडली असून आगामी निवडणूकीच्या दृष्टीने अजित पवार यांनी महाराष्ट्रातील काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविलेल्या आहेत त्यामध्ये पंढरपूरच्या श्रीकांत शिंदे यांच्यावर मराठवाड्यातील धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस निरीक्षकपदाची जबाबदारी देवून त्यांच्यावर आणखी विश्वास दाखविलेला आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे हे धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून युवकांची फळी मजबूत करून आगामी निवडणूकीत त्यातून राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करण्यासाठी मोलाची भर टाकणार असून राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीकांत शिंदे यांनी अगदी सर्वसामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रवादीच्या वरिष्ठांमध्ये आपल्या कामाच्या व कार्याच्या जोरावर वेगळा ठसा उमटविलेला आहे. सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम केलेले आहे. त्यामुळेच वरिष्ठांनी आता धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून नवीन जबाबदारी सोपवलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *