Uncategorized

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पशुआधार नोंदणीबाबत पशुपालकांसाठी चर्चासत्र

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पशुआधार नोंदणीबाबत पशुपालकांसाठी चर्चासत्र

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्र शासनाचे पशुपालकांना शासकीय अनुदान मिळवण्यासाठी जनावरांचे ऑनलाईन पशू आधार नोंदणीस सुरुवात केली आहे परंतू त्यास अडचणी येत आहेत. त्यास मुदतवाढ मिळावी तसेच नोंदणी केलेल्या दिवसापासून पशुपालकांना अनुदान मिळावे त्याकरीता राज्याचे दुग्ध विकास मंत्री यांचेकडे पाठपुरावा करु असे आश्वासन सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांचेवतीने दुध उत्पादकांच्या पशुंसाठी ऑनलाईन टॅगींग संदर्भात विचार विनिमय बैठक आयोजित केली होती त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन चेअरमन कल्याणराव काळे बोलत होते. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी पशु संवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ.एम.एम भिगारे,चंद्रभागा डेअरीचे कार्यकारी संचालक विलासराव काळे,.मनोज तुपे पारस डेअरीचे संकलन विभाग प्रमुख, प्रमोद माने, पशुसेवा विस्तार अधिकारी डॉ.किशोर नवले, डायनामिक्स डेअरीचे संकलन अधिकारी सुधीर देवकते, पांडूरंग कौलगे, अशोक भिंगारे, सुनिल पवार,मयुर खंडेलवाल यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. भिगारे म्हणाले की पशुंचे ऑनलाईन आधार लिंकिंग करणे गरजेचे असून ऑनलाइन पशु आधारच्या माध्यमातून जनावरांची पाठीमागील संपूर्ण माहिती मिळण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. सर्व पशुपालकांनी जनावरांचे ऑनलाईन पशूआधार काढणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख प्रमोद माने यांनी सांगितले की, सकस दूध अथवा चांगल्या प्रतीचे दूध करण्यासाठी गाईला दिला जाणारा आहार व गाईची पैदास महत्त्वपूर्ण असून पशुपालकांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी पशुपालक, पशु वैद्यकीय अधिकारी व संघचालक एकत्रित येऊन पशुआधार ऑनलाईन लिकिग करणेबाबत सहकार्याची भूमिका घ्यावी.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कार्यक्रमाचे संयोजक समाधान काळे यांनी केले. प्रास्ताविकात ते म्हणाले की ऑनलाईन पशु आधार लिंकिंगबाबत पशुपालकांच्या अनेक अडचणी असून कमी वेळात जास्तीत जास्त पशुपालकांचे पशुआधार ऑनलाईन होण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून ठिकठिकाणी चर्चासत्राचे आयोजन करून पशुपालकांना माहिती करून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमास पंढरपूर तालुक्यातील दूध संकलन केंद्रांचे चेअरमन पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समाधान काळे यांनी केले. आभार सरपंच रणजीत जाधव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *