राजकीय न्यूज

कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांनी घेतली उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांची भेट

कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांनी घेतली उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांची भेट

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० जानेवारी २०२४ : कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांनी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट घेत त्यांना सदर घटनेच्या केसच्या सद्यस्थितीबाबत व केस मधील प्रलंबित विषयाबाबत माहिती दिली.तसेच कुळधरण ग्रामपंचायत पोलीस पाटील समीर पाटील यांनी गावातील विविध विकासकामां बाबतचे निवेदन उपसभापती डॉ.गोऱ्हे यांना दिले.

 

या प्रकरणातील सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी सांगितले.कुळधरण ग्रामपंचायत विकासा साठी सहकार्य केले जाईल असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *