सामाजिक न्यूज

युमॅनीटी फाउंडेशने राबवला एक नविन उपक्रम -एक हाथ मदतीचा

युमॅनीटी फाउंडेशने राबवला एक नविन उपक्रम -एक हाथ मदतीचा

धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज- युमॅनिटी फाउंडेशन तर्फे रावळनाथ शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ यांचे राऊळ खानोलकर निवासी मुक बधिर व मतीमंद विद्यालय जुन्नेर येथे २६ जानेवारी निमित्ताने युमॅनिटी फाउंडेशन मार्फत एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या युमॅनिटी फाउंडेशनने आश्रमातील मुक बधिर विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात लागणा-या उपयोगी वस्तु व जीवनाशयक वस्तु देण्यात आल्या.

या विद्यार्थ्यांसोबत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या फांडेशनने राबविलेल्या या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थी उत्साहित व आनंदीत झाले.

हा कार्यक्रम फाउंडेशनचे प्रमुख सौ.वैशाली किशोर काळे मॅडम यांच्यावतीने राबविण्यात आला. या कार्यक्रमात फाउंडेशनचे सदस्य ॲड.चैतन्य भंडारी, प्रीत बरन, मनिष चौधरी, वैभव विभुते, राकेश चौधरी, पुष्पेश श्रीखंडे, चार्मिश भंडारी, सोनी वर्मा मॅडम, संदिप सोनार, रियाज मास्टर यांचा सक्रीय सहभाग होता. या कार्यक्रमात विद्यालयातील वस्ती अधिक्षक आप्पा भगवान कुवर सर व इतर शिक्षकेतर कर्मचारी व जुन्नेर गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *