मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार्‍या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून पहारा देणारे विणेकरी यांची निवड

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार्‍या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून पहारा देणारे विणेकरी यांची निवड Selection of Vinekari as guardian of honor for official Maha Puja to be held by the Chief Minister

पंढरपूर – आषाढी यात्रा दरवर्षी आषाढ शुध्द एकादशी या दिवशी भरते . सन २०२१ यावर्षी आषाढी यात्रा मंगळवार ,दि २० जुलै २०२१ रोजी आहे . या दिवशी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे , महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते सपत्नीक श्रीची शासकीय महापुजा केली जाणार आहे . मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत श्रींच्या शासकीय महापूजेवेळी मानाचा वारकरी श्रीच्या दर्शन रांगेतून निवडला जातो व त्यांना शासकीय महापूजेची संधी दिली जाते . तथापि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता आषाढी यात्रा कालावधीत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे .त्यामुळे श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात २४ तास पहारा देणारे विणेकरी यांची मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार्‍या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला होता . त्यानुसार श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात पहारा देणा -या एकूण ८ विणेकर्यांपैकी २ विणेकर्यांना मागील वर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला संधी मिळाली होती . तसेच ४ विणेकर्यांचा सेवेचा कालावधी एक वर्षापेक्षा कमी असल्याने केशव शिवदास कोलते व बापू साळुजी मुळीक या दोन विणेकर्यांपैकी पांडूरंग चिट्टीने केशव शिवदास कोलते वय ७१ वर्षे ,रा.मु.संत तुकाराम मठ , वार्ड नं .१५ ,नवनाथ मंदिर पाठीमागे वर्धा , ता.जि.वर्धा यांची दि.१६/०७/ २०२१ रोजी दुपारी १२.०० वा . मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली आहे.

   श्री.कोलते हे मागील २० वर्षापासून मंदिरात विणा वाजवून पहारा देत आहेत.ते स्वतः व त्यांचे कुटुंबिय देखील माळकरी आहेत.यावेळी मा.सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर , सदस्य श्रीमती शकुंतला नडगिरे , ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ह.भ.प.प्रकाश जवंजाळ तसेच कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते . त्याप्रमाणे केशव शिवदास कोलते वय ७१ वर्षे व सौ.इंदूबाई केशव कोलते, वय ६६ वर्षे या दापत्याची आषाढी एकादशी दिवशी पहाटे मुख्यमंत्री महोदय यांचे शुभहस्ते होणा-या श्रींच्या शासकीय महापुजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवडण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: