पोलीस स्टेशन सॅनिटायझर करून देणार ब्राह्मण महासंघ
पोलीस स्टेशन सॅनिटायझ करून देणार ब्राह्मण महासंघ Brahmin mahasangh to sanitize police station
खर्डी,अमोल कुलकर्णी – जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर समाजाची काळजी,सुरक्षा पोलीस अधिकारी घेत आहेत.पण त्यांनाही कौटुंबिक जबाबदारी आहे याचे भान ठेवून त्यांच्या सुरक्षिततेसाठी पंढरपूर ब्राह्मण महासंघाने पुढाकार घेतला आहे.

पंढरपूर शहरातील पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच पंढरपूर तालुका(कराड नाका) , ग्रामीण पोलीस स्टेशन (उजनी वसाहत) आणि मंदिर समितीचे पोलीस कार्यालय आठवड्यातून दोन वेळा संपूर्ण सॅनिटायझ करून देण्याची जबाबदारी येथील ब्राह्मण महासंघाच्या वतीने स्वीकारण्यात आली. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम ,तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर ,पंढरपूर ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर पुढील आखणी करण्यात येणार असल्याचे विजय तेंडुलकर यांनी सांगितले.यावेळी तालुका अध्यक्ष अमोल कुलकर्णी,महिला प्रमुख अमृता बडवे,शहराध्यक्ष महेश काळे,महिला व्यवसाय आघाडी धनश्री उत्पात,मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.सदर भेट आणि चर्चेवेळी पोलीस कर्मचारी यांना एन 95 आणि काही निवडक मास्क व फेसशील्डचे वाटप करण्यात आले.
