आम्ही तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका’ लोणकर कुटुंबियाना दिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धीर

आम्ही तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका’ लोणकर कुटुंबियाना दिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धीर We are with you,don’t worry ‘Chief Minister Uddhav Thackeray reassured the Lonakar family
स्वप्नीलच्या बहिणीला सक्षम करण्यासाठी कार्यवाहीचे दिले निर्देश

मुंबई, दि.१६ जुलै २०२१ – ‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत.काळजी करू नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना धीर दिला.
स्वप्नील लोणकर यांचे आई, वडील आणि बहिण यांनी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वप्नीलचे आई, वडीलांचे सांत्वनही केले. तसेच स्वप्नीलची बहिणीला करता येईल, ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वस्तही केले. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी स्वप्नीलच्या आई सौ. छाया, वडील सुनील तसेच बहिण पूजा यांची आस्थेवाईकपणे विचारपूसही केली. घटना दुर्देवी आहे. पण धीराने घ्यावे लागेल. आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका, असा धीर दिला.

  आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवसेनेच्यावतीने शिवसेना मदत निधी अंतर्गत पाच लक्ष रुपये मदत करण्यात आली.कालच दि.१५ जुलै,२०२१ रोजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आणि आ.तानाजी सावंत यांनी भेटू घेऊन सांत्वन केले तसेच त्यांना एकूण ११ लक्ष रुपये मदत केली होती. त्याचबरोबर आज लोणकर यांच्या कुटुंबावर आयडीएफसी बँकेचे उदरनिर्वाहसाठी काढलेले कर्ज देखील डॉ.गोऱ्हे यांनी पूर्ण रक्कम भरून कर्ज बेबाक केले आणि  स्वप्नीलची बहीण पूजा हिला नौकरी देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

   याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सर्वश्री अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर, सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: