दिन विशेषसामाजिक न्यूज

आपल्या मराठी कवितांनी भाषेचे संवर्धन मोठ्या प्रमाणात केले –

कर्मवीर मधील कवी संमेलनात रसिक श्रोते मंत्रमुग्ध

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज– धाव रे विठ्ठला गाभाऱ्यातूनी,

थेंब होवूनी तू सांड रानातूनी,

तू उभा ठेवूनी हात कमरेवरी, पाहसी का असा अंतरे श्रीहरी

हाक येई तुला पाना पानातूनी, थेंब होवूनी तू सांड रानातूनी”
या कवी ज्ञानेश्वर डोंगरे यांच्या काव्यपंक्तीने मराठी कविता रसिकांची मने जिंकली.अशा एकाहूनी एक कवितेने श्रोतावर्ग काव्यरसात डुंबून गेला. प्रेम कविता, भक्ती कविता, श्रम कविता, कृषी कविता, निसर्ग कविता अशा विविध कवितांनी कवींनी उपस्थित श्रोत्यांना प्रतिमा, प्रतिभा आणि कल्पनेच्या विश्वाची सफर घडविली. निमित्त होते मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे.

रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात मराठी विभाग व मराठी साहित्य परिषद पंढरपूर शाखेच्या सामंजस्य करारांतर्गत काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते.

या काव्यसंमेलनात कवी सर्वश्री हरिश्चंद्र पाटील,संभाजीराव अडगळे, ज्ञानेश्वर डोंगरे, सुनील जवंजाळ,सूर्याजी भोसले,भास्कर बंगाळे, दत्ता तरळगट्टी, गजानन गायकवाड आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे म्हणाले की,कविता हा अल्पाक्षरी साहित्य प्रकार आहे. मात्र त्यात भावनांचा गर्भित अर्थ व्यापकपणे दडलेला असतो. कविता ऐकल्याने मनाचे समाधान होते. आपल्या मराठी कवितांनी भाषेचे संवर्धन मोठ्या प्रमाणात केले आहे.कवीच्या भावनांची गुंफण शब्दातून पहायला मिळते.

या काव्यसंमेलनाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रो.डॉ.राजाराम राठोड यांनी केले. कवींचा परिचय आणि स्वागत प्रा.डॉ. रमेश शिंदे यांनी केले.

या कार्यक्रमास प्रा.डॉ. समाधान माने, प्रा. डॉ.दत्तात्रय काळेल, सिद्धार्थ ढवळे सर, साहित्यिक सीताराम सावंत,सिनिअर, जुनिअर व व्होकेशनल विभागातील सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.दत्ता डांगे,प्रा. हरिभजन कांबळे, डॉ.सुमीत साळुंखे, ओंकार नेहतराव,अमोल माने,अभिजित जाधव यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.सारिका भांगे यांनी केले.या कार्यक्रमाचे आभार मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह कल्याणराव शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *