अशा शाळा व शिक्षण संस्थांवर कार्यवाही करा- भारतीय राष्ट्रवादी पक्षाचे अजित संचेती
अशा शाळा व शिक्षण संस्थावर कार्यवाही करा- भारतीय राष्ट्रवादी पक्षाचे अजित संचेती Take action against such schools and educational institutions – Ajit Sancheti of BRP

पिंपरी चिंचवड ,16/07/2021- खाजगी शाळेकडून पालकांना फी साठी तगादा व विद्यार्थीयांचे ऑनलाईन शिक्षण बंद करत आहेत प्रत्येक खाजगी शाळेला परिपत्रक काढून समज देण्याबाबत व सरकारी आदेश मोडल्या प्रकरणी अशा शाळा व शिक्षण संस्था कार्यवाही करावी अशी मागणी भारतीय राष्ट्रवादी पक्षाचेवतीने राज्याचे संपर्क प्रमुख अजित प्रकाश संचेती यांनी केली आहे .
कोरोना महामारी लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला.त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून लाखो नागरिक बेरोजगार झाले आहेत.बहुतांशी पालक आपल्या पाल्यांची शैक्षणिक फी देखिल भरु शकत नाहीत. सरकारने काढलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करुन पालक व विद्यार्थ्यांकडे फी भरण्याबाबत तगादा लावणा-या शिक्षण संस्थांवर कडक कायदेशीर कारवाई प्रशासनाने करावी. सद्यः स्थितीत ऑनलाईन वर्ग सुरु झाले आहेत. परंतु फी बाकी असणा-या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून ऑनलाईन
वर्गाची लिंक पाठवली जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशाही शिक्षण संस्थांवर देखील कायदेशीर करावी व सर्व खाजगी शाळा यांना परिपत्रक काढून समज देण्यात यावे याबाबत पुणे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना निवेदन देण्यात आले .