जो तो म्हणतो माझेच खरे
जो तो म्हणतो माझेच खरे
जो सत्तेत तो म्हणतो माझेच खरे
जो विरोधक तोही म्हणतो माझेच खरे !
नक्की खरं कोणाचे
कोणालाच समजत नाही
जमेल तसं आपलं काम
नैतिक अनैतिक संविधानात्मक
वा असंविधानात्मक पद्धतीने करणे
कोणीही सोडत नाही
स्वार्थासाठी अंध फायद्याकरिता
मुके हाच व्यवहार राजमान्य आहे
कोण कोणास मोजतो
जो तो आपलंच खरं म्हणतो “!!
पण तो अधिक स्वार्थी झाला
माणूस शिक्षणाने खूप समृद्ध झाला
हे खरे आहे पण
तो अधिक स्वार्थी अन
स्वतःपुरता मर्यादित झाला
हेही त्याहून अधिक खरं आहे”!!
आनंद कोठडीया,जेऊर ता. करमाळा
९४९४६९२२००
