विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने हलगी नाद आंदोलन

विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने हलगी नाद आंदोलन Halgi Naad Andolan on behalf of Swabhimani Shetkari Sanghatana at Vitthal Sahakari Sugar Factory

पंढरपूर, 16/07/2021 -विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर ऊस बिले ,कामगारांचे पगार,तोडणी वाहतुकीची बिले मिळावीत तसेच विविध मागण्या साठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने हलगी नाद आंदोलन करण्यात आले.30 जुलैपर्यंत उसाची थकीत एफआरपी देण्यात येईल अशी लेखी हमी कारखान्याच्यावतीने देण्यात आली .

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दोन जुलै रोजी सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले होते . सोलापूर जिल्ह्यातील थकीत एफआरपी FRP दहा जुलै पर्यंत नाही मिळाली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला होता .

  त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज विठ्ठल सहकारी साखर कारखाना स्थळावर हलगी नाद आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल,पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील,जिल्हा संघटक शहाजहानभाई शेख,जिल्हा कार्याध्यक्ष रायाप्पा हळणवर ,राज्य प्रवक्ते रणजित बागल, युवक जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे,जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पाटील, पप्पू पाटील, माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर, सुलतानभाई शेख ,सचिन आटकळे, नामदेव कोरके, साहेबराव नागणे, कांतीलाल नाईकनवरे, दशरथ जवळेकर, अमर इंगळे, नवनाथ मोहिते, बाबासाहेब मुलाणी,  बाहुबली सावळे, नामदेव पवार, आप्पासाहेब चोरमुले, आप्पासाहेब कोरके ,बाबा कारंडे ,निलेश भैय्यासाहेब शेळके, समाधान नाईकनवरे, रामदास मोरे ,अक्षय महानवर यांच्यासह स्वाभिमानीचे सर्व नेते व शेतकरी बांधव उपस्थित होते.

 या आंदोलनानंतर तरी कारखान्याचे चेअरमन आणि संचालक मंडळाला जाग येईल अशी आशा आंदोलनकर्तै व्यक्त करतानाच आणखी किती आंदोलन केल्यानंतर पैसे दिले जाणार आहेत असा उद्विग्न होऊन शेतकरी राजा प्रश्न करत पुढच्या आंदोलनाच्या तयारीसाठी घरी परतला.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: